शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

By admin | Updated: January 11, 2015 00:45 IST

पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे,

फ्लोराईडयुक्त पाणी : लिंगटीतील अनेकांना ‘फ्लोरोसिस’ने जखडले!प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा (यवतमाळ) पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, कुणाचे दात लाल-काळे तर कुणाला सरळ चालता येत नाही. फ्लोरोसिसने जखडलेले हे गाव आहे, पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (भाडउमरी).पांढरकवडापासून २० किलोमीटर अंतरावर लिंगटी आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे गाव आदिवासीबहुल आहे. मात्र अज्ञान आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना उपलब्ध साधनसामग्रीवर चरितार्थ चालवावा लागतो. या गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि हेच पाणी आता नागरिकांना मरणाच्या दाढेत ढकलत आहे. गावात प्रवेश करताच ४० वर्षीय श्रावण पेंदोर भेटला. कमरेतून वाकलेला आणि मान हलवता न येण्याच्या स्थितीत तो जगत आहे. अशा स्थितीत तो आपले काम कसेबसे करीत होता. त्याची संपूर्ण पाठही अकडल्याचे दिसत होते. याबाबत विचारले असता श्रावण म्हणाला, ‘हा त्रास पाच ते सहा वर्षांपासून आहे. नागपूरला रुग्णालयातही जाऊन आलो. त्याठिकाणी ५० ते ६० हजार खर्च येईल, असे सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार न घेताच गावी परत आलो आणि आज अशा स्थितीत तुमच्यासमोर उभा आहे’. तानाबाई नैताम या ५० वर्षीय महिलेच्या हाताची सर्व बोटे लुळी पडली होती. त्याही कमरेतून वाकून चालत होत्या. तानाबाईशी संवाद सुरू असतानाच एक २० वर्षीय तरूण अडखळत चालत आला. त्याला विचारले तर तोही चार ते पाच वर्षांपासून हाडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. बघता-बघता कमलाबाई पेंदोर, जंगोबाई सुरपाम, भीमराव आत्राम, परशराम आत्राम असे अनेक स्त्री-पुरूष तेथे गोळा झाले. प्रत्येकाला हाडाशी संबंधित कोणता ना कोणता जडलेला होता. या भागात जमिनीतील पाण्यात फ्लोराईड हा क्षार अधिक प्रमाणात आहे. गावात असलेली विहीर ही गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. याच विहिरीतून मिळणारे फ्लोराईडयुक्त पाणी गावकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. काय आहे फ्लोराईड ? फ्लोराईड हा क्षार असून पाण्याच्या माध्यमातून तो शरीरात जातो. फ्लोराईडचे शरीरातील प्रमाण वाढल्याने फ्लोरोसिस हा आजार होतो. यात हाडांवर परिणाम होऊन ती वाकतात तसेच हाडे ठिसूळ होतात व सहज तुटतात, दातही वाकडे तिकडे होतात. त्याला डेन्टल फ्लोरोसिस म्हणतात. हा आजार टाळण्यासाठी फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये, हाच उपाय असल्याचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी सांगितले.