शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीभाेवती ३,००० मृत सॅटेलाइट्सचा कचरा, ठरू शकतो मोठ्या दुर्घटनेचं कारण, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 10:58 IST

मानवाने केलेली अस्वच्छता केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर अंतराळातही कचऱ्याचे ढिगारे साठवून ठेवले आहेत. अर्थात हा कचरा अंतराळाचा शाेध घेण्याच्या माेहिमेमुळे झाला आहे. हा कचरा थाेडाथाेडका नाही तर लक्षावधी टनांचा आहे.

- निशांत वानखेडेनागपूर : मानवाने केलेली अस्वच्छता केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर अंतराळातही कचऱ्याचे ढिगारे साठवून ठेवले आहेत. अर्थात हा कचरा अंतराळाचा शाेध घेण्याच्या माेहिमेमुळे झाला आहे. हा कचरा थाेडाथाेडका नाही तर लक्षावधी टनांचा आहे. सध्या पृथ्वीभाेवती दोन हजार सॅटेलाइट भ्रमण करीत आहेत. मात्र, निकामी झालेले तीन हजार मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान-माेठे लक्षावधी तुकडे केवळ पृथ्वीच्या कक्षेत विखुरले आहेत. हा कचरा नष्ट करणे हे जगभरातील अंतराळ संशाेधकांपुढचे आव्हान आहे.

किती आहे स्पेस जंक? १ मिलिमीटरपेक्षा माेठे स्पेस जंकचे १२८ दशलक्ष तुकडे पृथ्वीभाेवती पडले आहेत. २००९ ला एक व त्यानंतर मार्च २०२१ ला चीनचे सॅटेलाइट या कचऱ्याला धडकून नष्ट झाले हाेते.     १९५९ मध्ये रशियाच्या ‘लुना-२’ पासून अमेरिकेचे रेंजर-४, जपानचे हिटन, युराेपचे स्मार्ट-१, भारताचे चांद्रयान-१, चीनचे चँग-१ व इस्रायलचे बेरशीट यान चंद्रावरच साेडण्यात आले हाेते.     अमेरिकेच्या अपाेलाे १५, १६ व १७ यानात नेलेल्या तीन ‘मून बग्गी’ तेथेच आहेत.     याशिवाय अंतराळवीरांनी ठेवलेले फाेटाेग्राफ, गाेल्फ बाॅल व इतरही साहित्य चंद्रावर असेल. 

२००० सॅटेलाइटचे पृथ्वीभाेवती भ्रमण३००० मृत सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत पडले आहेत.३४,००० स्पेस जंकचे १० सेंटिमीटरपेक्षा माेठे तुकडे पडलेले आहेत.१,९०,००० किलाेग्रॅम साहित्य मानवाने चंद्रावर साेडले आहे.५४ मानवविरहित यान चंद्रावर उतरले किंवा क्रॅश झाले.

अनेक अंतराळ संशाेधक संस्थांनी मृत सॅटेलाइट जागेवर किंवा माेठे जाळे, चुंबक किंवा कुठल्या तरी शक्तीने पृथ्वीवर आणून नष्ट करण्याचे उपाय सुचविले आहेत. मात्र, ते केवळ माेठ्या उपग्रहापुरते मर्यादित आहेत. लक्षावधी लहान तुकडे नष्ट करणे हे आव्हान आहे. - महेंद्र वाघ, खगाेल शिक्षक, रमण विज्ञान केंद्र.

टॅग्स :Earthपृथ्वीInternationalआंतरराष्ट्रीय