शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

सावरकर यांच्यावरील हत्येचा ठपका पुसावा

By admin | Updated: September 7, 2015 00:52 IST

हात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतरही कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला

पार्ट ब्लेअर : महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतरही कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला. सावरकरांची बदनामी थांबवायची असेल तर सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अहवालातील परिच्छेद काढून टाकावा, अशी मागणी चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी केली.विश्व मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. मोरे म्हणाले, सावरकरांच्या मृत्यूनंतर कपूर कमिशनने दिलेल्या अहवालानुसार सावरकर यांच्याविरोधात सातत्याने लेखन केले जात आहे. न्यायालयाने सावरकर यांना निर्दोष ठरविले आहे. तरीही त्यांना कुणी दोष देत असेल तर थेट सावरकरप्रेमींनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. कारण कपूर कमिशनच्या दोन खंडाच्या अहवालात असे कुठेही म्हटलेले नाही, की सावरकरांमुळे गांधी यांची हत्या झाली. केंद्रात तसेच राज्यात किमान सावरकरद्वेषी सरकार नाही, त्यामुळे या सरकारांनी पुढाकार घेऊन अहवालातील संबंधित परिच्छेद काढून टाकावा.सावरकर यांच्या विचाराने माझी वाटचाल सुरू झाली. कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी सावरकर मांडत आलो आहे. पुढच्या पिढीकडे हा वारसा पोहोचवत आहे. सावरकरांना समर्पित साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तनाची नांदी आहे. सावरकर यांचा बुद्धिवाद घ्या, त्यांची हिंदूहिताची दृष्टी घ्या, सावरकर यांना सोडून देशाला एकही पाऊल टाकता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सावरकर यांच्यावर आधारित कार्यक्रम झाले. ‘समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठा’ हा परिसंवाद रंगला. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणजे काय, या वेळी सांगण्यात आले. ‘मी सावरकर बोलतोय’ हा विशेष एकपात्री कार्यक्रम झाला. अभिनेते योगेश सोमण यांनी याचे सादरीकरण केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेने आयोजित केलेला ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाद्वारे महाकवी सावरकर यांचे अनोखे दर्शन झाले.संमेलनाच्या समारोप समारंभाला घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे, अंदमानच्या कला आणि संस्कृती विभागाचे प्रमुख आर. देविदास, अंदमानचे खासदार विष्णूदास रे यांच्या पत्नी रूपा, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, पोर्ट ब्लेअर महाराष्ट्र मंडळाचे अरविंद पाटील उपस्थित होते.