शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

चक्क चार महिन्यांनी अवतरलेल्या ग्रामसेवकाची पाय धुवून आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:43 IST

घाटंजी तालुक्यातील प्रकार : ना सरपंच ना ग्रामसेवक, पंचायत समितीचे दुर्लक्ष

यवतमाळ : गावाचे प्रशासन हाकणारे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. भोळीभाबडी जनता हा प्रकार वर्षानुवर्षे निमुट सहन करीत आली. मात्र एका गावात संयमाचा हा बांध फुटला आणि चक्क चार महिन्यांच्या दीर्घ दडीनंतर गावात अवतरलेल्या ग्रामसेवकाची गावकऱ्यांनी पाय धुवून आरती केली. 

भोळ्या गावकऱ्यांच्या या गांधीगिरीने ग्रामसेवकाचीही पाचावर धारण बसली. हा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापशी (को) येथे घडला. येथील ग्रामसेवक सुनील दरवे हे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी गावात आले होते. त्यानंतर त्यांनी जी दडी मारली, तर एप्रिल महिना संपेपर्यंत ते कापशीकडे फिरकलेही नाही. दरम्यानच्या काळात या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात आले. घाटंजी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याकडे कारभार गेला. मात्र विस्तार अधिकारीही कधीच गावाकडे फिरकला नाही. ना सरपंच ना ग्रामसेवक ना प्रशासक अशा परिस्थितीत कोरोना सारखी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

यातच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न खोळंबले आहेत. त्यामुळे गावकरी ग्रामसेवकाची चातकासारखी वाट पाहून संतापले होते. त्यातच मंगळवारी ग्रामसेवक येताच गावकऱ्यांनी त्यांची आरती केली. त्यांचे पाय धुवून पुष्पगुच्छ दिले. मात्र, ही गांधीगिरी करतानाच गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला गैरहजेरीबद्दल खडसावून जाबही विचारला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत