अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भात रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अजित पवार यांचा अपघात नाही, तर घात असू शकतो, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही भाष्य केले आहे. अजित पवार यांचा घातपात असावा, असे आपल्याला अजिबात वाट नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते पुण्यात शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
घातपात असावा असे मला अजिबात वाटत नाही -आठवले म्हणाले, "सर्वांनाच आपली मते मांडण्याचा अधिकार आहे, पण अजित दादा हे अत्यंत कणखर व्यक्ती होते, ते मोठे प्रशासक होते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज होते. त्यांनी आमच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे. राजकारणात अजित दादांचा दांडगा अनुभव होता. ते ६ वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या अपघातासंदर्भात अनेकांच्या मनात शंका आहेत, पण मला वाटते की, हा केवळ एक अपघातच आहे. कारण जो कॅप्टन होता तो नावाजलेला होता, त्याने सहारामध्ये जेटमध्ये काम केले होते. पण लँडिंगच्या वेळी त्यांची चूक झाली. जर तेथे लँडिंग अशक्य होते, तर ते एअरक्राफ्ट पुण्याला आणायला हवे होते. तर कदाचित अपघात झाला नसता. पण त्यांना कदाचित अंदाज आला नाही. हा अपघात आहे असे माझे मत आहे, घातपात असावा असे मला अजिबात वाटत नाही."
सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक -विमान कंपनीवरील बंदीसंदर्भात बोलताना आठवले म्हणाले, "जर कंपनीवर आधीच बंदी होती, तर त्यांना उडण्याची परवानगी द्यायला नको होती. जर कंपनीवर बंदी असेल, तर ते विमान कलिना विमानतळावर असायलाच नको होते. प्रशासनाच्या काही चुका असतीलही, परंतू, जर त्या कंपनीवर बॅन होता, तर ते एअरक्राफ्ट घेऊन जाणे अत्यंत अयोग्य होते. पण तरीही, कंपनीला विमान उडवायला परवानगी दिलीच कशी? याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. अशी आमची मागणी आहे."
"अजित दादांचे मंत्रिमंडळात मोठे स्थान होते, ते अत्यंत सक्रिय असलेले नेते होते, त्यांच्याबद्दल कुणी असा घातपात करेल, असे वाटत नाही, असेही आठवले म्हणाले.
'शरद पवार दोन-तीन दिवसांत पूर्णपणे बरे होतील' -"पवार साहेबांची भेट झालेली आहे आणि त्यांची तब्येत अत्यंत चांगली आहे. पवार साहेबांनी मला विचारलं पार्लमेंट सुरू आहे की नाही, तेव्हा मी त्यांना सांगितले की राज्यसभा सुरू आहे, पण लोकसभा मात्र चालत नाहीये, तिथे रोज गदारोळ होतोय. पवार साहेबांची 'विल पॉवर' मोठी आहे आणि ते दोन-तीन दिवसांत पूर्णपणे बरे होतील, अशी अपेक्षा आहे. आपली तब्येत चांगली असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे.
Web Summary : Ramdas Athawale dismisses conspiracy theories surrounding Ajit Pawar's accident, attributing it to pilot error. He emphasizes Pawar's strength and contributions, advocating for a thorough investigation into the airline's operational clearance despite a prior ban. He also reports Sharad Pawar's improving health.
Web Summary : रामदास अठावले ने अजित पवार की दुर्घटना के बारे में साजिश के सिद्धांतों को खारिज कर दिया, इसे पायलट की त्रुटि बताया। उन्होंने पवार की ताकत और योगदान पर जोर दिया, और पहले प्रतिबंध के बावजूद एयरलाइन की परिचालन मंजूरी की गहन जांच की वकालत की। उन्होंने शरद पवार के स्वास्थ्य में सुधार की भी जानकारी दी।