शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

...तर मला वेगळा विचार करावाच लागेल, खडसेंचा भाजपा नेतृत्वाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 19:22 IST

राज्यातून सत्ता गेल्यानंतर भाजपाअंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे.

मुंबई- राज्यातून सत्ता गेल्यानंतर भाजपाअंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे. एकनाथ खडसे यांनी ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचं सांगितल्यानंतर गिरीश महाजनांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. भाजपामध्ये कोणालाही डावललं जात नाही, मी स्वत: OBC, भाजपामध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीच आहेत, असं महाजन म्हणाले होते, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधला हा कलगीतुरा आणखीच वाढताना दिसतो आहे. खडसेंनी आता प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना भाजपाला निर्णायक इशारा दिला आहे. भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक शनिवारी जळगावात एका खासगी रिसॉर्टवर झाली. त्यावेळी खडसे हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राची बैठक असूनही आपणास यासाठी ३.३० वाजता या, असे सांगण्यात आले. याशिवाय पक्षाच्या कोअर कमिटीतूनही आपणास काढून टाकण्यात आले आहे.  मला आता निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक मला दूर करण्यात येत असेल तर मी काय भूमिका घेतली पाहिजे. काही लोकांकडून सातत्यानं अपमान होतोय. अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, अशा इशाराच खडसेंनी भाजपाला दिला आहे. पुढे ते म्हणाले, बहुजन समाज आणि ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्ते आजही आम्हाला अन्याय होत असल्याचं सांगत असतात. ओबीसींवर अन्याय होतो की नाही याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. राज्यातल्या लोकप्रतिनिधी, माजी आमदार यांची जी भावना आहे. ती पक्षाच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आम्हाला जातीवर बोलायाचं नाही, पण जे घडलं आहे ते तर समोर आलंच पाहिजे. हे जर कोणी करत असेल, तर त्याला प्रतिबंध बसला पाहिजे. 

भाजपाचा चेहरामोहरा बदलवण्याचं काम मी मधल्या कालखंडात केलं. मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे आणि अण्णा डांगे असतील. या सगळ्याच नेत्यांनी पक्ष वाढवला आहे. ज्या पक्षांचे दोन खासदार होते, विधानसभेत फक्त 14 आमदार होते. त्या पक्षाला सत्तेवर बसवण्यामध्ये ओबीसी नेत्यांनी केलेली मेहनत विसरता येणार नाही. ओबीसी आणि बहुजन नेत्यांनी जिवाचं रान केल्यानंच पक्ष मोठा झाला. पक्ष मोठा झाला म्हणून नेतृत्व मिळालं आणि पक्षविस्ताराला वाव मिळाला. पक्षविरोधी काम केलेल्यांवर कारवाई केलीच पाहिजे. चंद्रकांत पाटलांकडे मी सर्व कागदोपत्री पुरावे दिलेले आहेत. ते आता योग्य ती कारवाई करतील, असंही खडसे म्हणाले आहेत.  

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन