शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वारी यंदाही बसनेच!, राज्यभरातून १० पालख्या जाणार; प्रत्येक पालखीला दोन गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 08:40 IST

Wari : यंदा किमान काही पालख्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह विश्वस्त आणि वारकरी मंडळींनी केला होता.

पुणे/सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  गतवर्षीप्रमाणेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह १० मानाच्या पालख्या एसटी बसमधून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूरला जाणार आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.

यंदा किमान काही पालख्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह विश्वस्त आणि वारकरी मंडळींनी केला होता. यातून मार्ग काढण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. 

पादुकांसोबत ६० जण गतवर्षीच्या तुलनेत पालखी प्रस्थान सोहळा व वारीमध्ये उपस्थितांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. एका पालखीसोबत ६० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू आणि आळंदी येथे प्रत्येकी शंभर लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

अहवालानंतरच निर्णय याबाबत नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदादेखील आषाढी वारी एसटी बसमधून घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

पालखी सोहळ्याबाबत असे झाले निर्णय- देहू, आळंदीसह राज्यातील १० मानाच्या पालख्यांनाच परवानगी.

- देहू-आळंदी येथील पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रत्येकी शंभर लोकांचीच उपस्थिती.एका पालखीसोबत दोन एसटी बस व ३०-३० वारकरी, भाविक जाऊ शकतात.यंदादेखील पायी पालखी सोहळा, वारीला परवानगी नाही.

मानाच्या १० पालख्या- संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी- संत तुकाराम महाराज, देहू- संत निवृत्ती महाराज, त्र्यंबकेश्वर- संत सोपानकाका महाराज, सासवड- संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर- संत नामदेव महाराज, पंढरपूर- संत एकनाथ महाराज, पैठण- रुक्मिणीमाता, कौंडण्यपूर-अमरावती- संत निळोबाराय, पिंपळनेर-पारनेर अहमदनगर- संत चांगावटेश्वर, महाराज, सासवड

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्या