शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

महिलेचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची जमावाने केली हत्या

By admin | Updated: May 25, 2014 19:19 IST

सातारा येथील वाई परिसरात रुग्णालयातील महिला रुग्णाला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची संतप्त जमावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.

ऑनलाइन टीम

सातारा, दि. २५ - सातारा येथील वाई परिसरात रुग्णालयातील महिला रुग्णाला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची संतप्त जमावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. 
मुंबईत राहणारी विवाहीत महिला साता-यातील वाई येथे मूळगावी गेली होती. महिलेच्या सासूचे नुकतेच निधन झाल्याने विवाहीत महिला गावी गेली होती. शनिवारी संध्याकाळी विवाहित महिलेला उच्चरक्तदाबाचा त्रास सुरु झाला. अखेरीस त्या महिलेला वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री रुग्णालयातील वॉर्डबॉयने तिला गुंगीचे इंजेक्शन दिले व तिचा विनयभंग केला.  रविवारी सकाळी सातच्या सुमारास महिलेने तिच्या पतीला हा सर्वप्रकार सांगितला. यानंतर महिलेच्या पतीने अन्य काही नातेवाईकांना रुग्णालयात बोलवून घेतले. या सर्वांनी रुग्णालयाच्या बाहेर वॉर्डबॉय तुषार जाधवला गाठले. महिलेच्या पतीने व नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तुषारला सातारा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी संध्याकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तुषारवर विनयभंग तर पिडीत महिलेच्या पतीसह अन्य काही नातेवाईकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.