शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मविआ सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करावी - बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 13:13 IST

चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचना पुन्हा करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. 

मुंबई : राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले असून महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय माघारी घेण्याचा सपाटा सुरू केलाय. अशातच, भाजपकडून आणखी एक मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील होऊ घातलेल्या जि.प., महापालिकेच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्यात याव्या, अशी मागणी भाजप नेते व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेली प्रभाग रचना, गट रचना सदोष असून तोडून-मोडून तयार करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप बावनकुळेंनी केला. त्यामुळे त्या रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्यात याव्या, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचना नव्याने करण्यात याव्या अशी मागणी केली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकार स्थापन होण्याआधीच इतकी घाई कशासाठी? असा सवाल केला आहे. तर, या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राम कदम यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.

शेख हुसैन यांच्यावर तत्काळ कारवाई करावी

नागपूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चात शेख हुसैन यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, याबाबत आम्ही तक्रार दाखल केली होती. परंतु, अजूनही पोलिसांनी यावर कायदेशीर कलमा लावून कारवाई केलेली नाही. याप्रकरणी पोलीस कमिश्नर यांना पुन्हा भेटून तत्काळ कार्यवाहीबाबत मागणी असल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेच त्यांच समर्थन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग