शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडे हे भाजपचे म्होरके; नवाब मलिक यांचा नव्याने आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:02 IST

प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

वडगाव मावळ (जि. पुणे) : फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करीत आहे. एनसीबीचे समीर वानखेडे हे भाजपचे म्होरके आहेत. प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.वडगाव मावळ येथे अल्पसंख्याक विभागीय कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिरासाठी ते गुरुवारी आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या बोगसगिरीबाबत अनेक पुरावे आहेत. येणाऱ्या काळात आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारे तोडपाणी मालदीव आणि दुबईत चालते. दहशत निर्माण करण्यासाठी सध्या मंत्री, नेते, कार्यकर्ते यांची चौकशी करून केंद्र सरकार बोगसगिरी करीत आहे. यंत्रणेचा कितीही गैरवापर केला तरी महाविकास आघाडीतील मंत्री, नेते, कार्यकर्ते घाबरणार नाहीत.बंगालच्या निवडणुकीत हेच हत्यार त्यांनी वापरले. तिथल्या जनतेने त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे. आगामी काळात बंगाल, महाराष्ट्र व पंजाब ही तिन्ही राज्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो