शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान नाकारायचंय? ...मग नाकारू शकता; राज्य सरकारचा निर्णय, महाडीबीटीवर देणार पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:02 IST

महाडीबीटी पोर्टलवर ‘गिव्ह इट अप सबसिडी’ असा पर्याय उपलब्ध असेल. अनुदान नाकारण्याची अधिकृत सोय त्यामुळे आता सर्वांना उपलब्ध होणार आहे. 

मुंबई : सरकारी अनुदान  किंवा सरकारकडून मिळणारे कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ स्वेच्छेने नाकारायचे असतील तर तशी सोय राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ‘गिव्ह इट अप सबसिडी’ असा पर्याय उपलब्ध असेल. अनुदान नाकारण्याची अधिकृत सोय त्यामुळे आता सर्वांना उपलब्ध होणार आहे. 

 सामान्य प्रशासन विभागाने या संबंधीचा शासकीय निर्णय बुधवारी काढला. विविध प्रकारचे सरकारी अनुदान हे कोट्यवधी लोकांना दिले जाते पण, या अनुदानाची आपल्याला गरज नाही, ते सरकारला परत करायला हवे असे वाटणारेही काही लोक असू शकतात. मात्र, ते परत करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नसतो. 

या पार्श्वभूमीवर, भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. अनुदान नाकारण्याचा हक्क नियमानुसार नागरिकांना द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर, असा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते.

अनुदान कसे नाकारायचे? महाडीबीटी पोर्टलमार्फत अनुदानाची प्रक्रिया राबविली जाते. या पोर्टलवर ‘गिव्ह इट अप सबसिडी’ (अनुदान स्वीकारण्यास नकार) असा एक पर्याय दिलेला असेल. त्या समोरचे बटण लाभार्थीस दाबावे लागेल. ते दाबल्यानंतर पॉप-अप विंडोमध्ये सूचना येईल. ती मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाइलवर ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी अर्जदाराने वेबसाइटवर नोंदविल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. 

अनुदानाची ‘ती’ रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत?अनुदानाची जेवढी रक्कम नाकारली जाईल तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन आहे. या रकमेचा फायदा पुन्हा समाजातील वंचितांनाच व्हावा हा त्यामागील उद्देश असेल.

योजनेबाबत उत्सुकता-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारण्याची मुभा देणारी ‘गिव्ह इट अप सबसिडी’ मोहीम सर्वप्रथम २०१५ मध्ये राबविली होती.

-त्याला प्रतिसाद देत एक कोटीहून अधिक लोकांनी स्वेच्छेने अनुदान नाकारले. या योजनेसाठी किती लोक पुढे येतात, याची उत्सुकता आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारGovernmentसरकारChief Ministerमुख्यमंत्री