शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

गणेशोत्सवाला गावी जायचंय, पण कन्फर्म तिकीट मिळत नाही? ‘हा’ विकल्प वापरुन पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:54 IST

Ganeshotsav Confirm Railway Ticket Trick Vikalp: गणपतीत गावाला जाताना कन्फर्म तिकीट हवेय? तर काही पर्यायांचा वापर करू शकता, असे सांगितले जात आहे.

Ganeshotsav Confirm Railway Ticket Trick Vikalp: श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की, गोपाळकाला साजरा केला जातो. यानंतर अनेक जण गणपतीची तयारी करण्यासाठी गावी जातात. तर अनेक जण गणपतीच्या काही दिवस आधी तर काही जण आदल्या दिवशी गावच्या घरी पोहोचण्याच्या दृष्टीने तिकीटे काढत असतात. कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर शेकडो अतिरिक्त ट्रेन सेवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोडण्यात येतात. परंतु कन्फर्म तिकीट मिळत नाही. 

गणेशोत्सवात कन्फर्म तिकीट मिळणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. सकाळी ८ वाजता किंवा तत्काळचे १० वाजता तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर अवघ्या काही सेकंदात वेटिंग लिस्ट किंवा यादी बंद होण्याचा मेसेज दिसतो. कितीही तयारीने बसले तरी तिकीट काही मिळत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. कन्फर्म तिकीट वाढण्यासाठी काही सोपे पर्याय उपलब्ध असतात. त्याचा वापर करून पाहू शकता, असे सांगितले जाते. 

भारतीय रेल्वेची पर्यायी योजना

भारतीय रेल्वेने प्रवाशांना सहजपणे निश्चित जागा मिळण्यासाठी ‘विकल्प’चा पर्याय आणला आहे. ही एक अशी सुविधा आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढवू शकता. ‘विकल्प’चा पर्याय कशा पद्धतीने काम करतो आणि तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता? या योजनेत वेटिंग तिकीट ऑनलाइन बुक करताना प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडता येतो. असे केल्याने तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता वाढते.  प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळावेत यासाठी हा पर्याय

IRCTC तिकीट बुकिंग योजनेमुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात आणि अन्य वेळेस कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण होते. विकल्प योजनेचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेलच. परंतु, या योजनेअंतर्गत आपल्या प्रवाशांना इच्छित ठिकाणी अन्य ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करता यावा आणि त्यांचा प्रवास सुनिश्चित व्हावा, यासाठी हा पर्याय रेल्वेने आणला आहे. या विकल्प पर्यायात रेल्वे आणि रिक्त जागा यांवर तिकीट कन्फर्म होणार की नाही, ते अवलंबून असते. 

विकल्प पर्याय कसा वापरावा?

IRCTC ची विकल्प योजना वापरण्यासाठी IRCTC वेबसाईट वरून तिकीट बुक करताना ट्रेनमधील जागांची उपलब्धता तपासायला हवी. ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्यास ऑनलाईन ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही विकल्प निवडा. यानंतर IRCTC तुम्हाला तुमच्या आवडीच्या इतर ट्रेन बद्दल विचारते ज्यामध्ये तुम्ही सात ट्रेन निवडू शकता. तिकीट बुकिंग दरम्यान ऑप्शन उपलब्ध नसेल तर तुम्ही बुक केलेला तिकीट हिस्ट्रीमध्ये जाऊन तिकिटाचा पर्याय निवडू शकता. यानंतर भारतीय रेल्वे तुमच्या पसंतीच्या इतर ट्रेनमध्ये तुमच्यासाठी कन्फर्म तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव