शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वणी वेकोलि क्षेत्र : ब्राह्मणी मार्ग झाला कोळसा हेराफेरीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:51 IST

खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविला जातो. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून उर्वरित कोळशात काळ्या रंगाची माती व दगड मिसळविले जातात.

वणी (यवतमाळ) -  खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविला जातो. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून उर्वरित कोळशात काळ्या रंगाची माती व दगड मिसळविले जातात. त्यानंतर तेथून तो माती, दगड मिश्रित कोळसा रेल्वेसायडिंगवर पोहचविला जातो. त्यामुळे ब्राह्मणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाल्याचे पंचक्रोशीतील गावकरी सांगतात.वणी बायपासवरील ब्राह्मणी मार्गाच्या पुढे वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी आहेत. या मार्गाने दररोज मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. याच मार्गावर किमान चार ठिकाणी कोळशाची हेराफेरी केली जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. निळापूर-ब्राह्मणी या गावांच्या पुढे कोलारपिपरी, पिंपळगाव, जुनाड, निलजई, नायगाव, उकणी आदी कोळसा खाणी आहेत. त्यामुळे वाहतुकीदरम्यान, कोळशाची हेराफेरी करणे सोईचे जावे, यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला ट्रकमधील कोळसा डम्प करून नंतर त्यात हेराफेरी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. असे असले तरी वेकोलि प्रशासन अथवा पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या हेराफेरीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.कोळशात माती व दगड मिश्रण करणारे मजूरही गुंड प्रवृत्तीचे असून यासाठी त्यांना मोठी रक्कम अदा केली जाते. या मजुरांजवळदेखील घातक शस्त्रे असतात, असे सांगितले जाते. कोळशात माती व दगड मिसळविल्यानंतर कोळशाने भरलेला ट्रक वणी रेल्वे सायडिंगवर आणला जातो, त्यावेळी अनेकदा या कोळशाचे मोजमापही केले जात नसल्याची माहिती आहे. यासाठी संबंधित ‘काटाबाबू’ला देखील मोठी बिदागी दिली जात असल्याची चर्चा आहे. एकूणच हा तस्करीचा व्यवसाय सर्व पातळ्यांवर ‘मॅनेज’ असल्याने कोणत्याही कारवाया होताना दिसत नाही.मिश्रणासाठी कोळसा खाणीतीलच दगड-मातीकोळशात केलेली हेराफेरी उघड होऊ नये, यासाठी खाणीतूनच दगड आणि माती आणली जाते. या दगड आणि मातीचा रंगही काळाच असतो. त्यात काही प्रमाणात कोळशाची बारीक चुरीदेखील असते.त्यामुळे तो कोळसा आहे की दगड आहे, हे सहज लक्षात येत नाही. कोळशात त्याचे मिश्रण केल्यानंतर तर लक्षात येत नाही. त्यामुळे कोळसा तस्कर हा फंडा वापरत आहेत.‘लोकमत’च्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणेची पाळत : गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’मध्ये वणी वेकोलि क्षेत्रात सुरू असलेल्या कोळसा चोरीबद्दल वृत्तमालिका प्रकाशित केली जात आहे. त्यामुळे कोळसा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पोलीस यंत्रणाही या तस्करांवर पाळत ठेऊन आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या