नाशिक : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे हा उपाय ठरू शकत नाही, तर सरसकट कर्ज माफ करण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत उदासीन राहून चालणार नाही. राज्यात मान्सून लांबण्याचा अंदाज एकीकडे वेधशाळांमार्फत वर्तविला जात असताना दुसरीकडे राज्य सरकार अद्यापही दुष्काळासारखे संकट गांभीर्याने घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.भाजपा सरकारने राज्यासह संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’ची आशा लावली; मात्र एक वर्षाचा अवधी उलटूनही ‘अच्छे दिन’बाबत कुठलेही चित्र पहावयास मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने दोनशे कोटींची तरतूद केली असली तरी, ती पुरेशी नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांना तरी ‘अच्छे दिन’ येऊ देतदेशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना तरी ‘अच्छे दिन’ येऊ देत, असा टोला चव्हाण यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या राज्यस्तरीय मेळावा लगावला. स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनामध्येही दरवर्षी वाढ करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. ही तर सरकारची नामुष्की : कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पोलीस यंत्रणेला विशेषत: तपास पथकाला संशयितांच्या मुसक्या आवळण्यामध्ये यश येत नाही, ही पोलीस यंत्रणेबरोबरच सरकारची नामुष्की असल्याचे चव्हाण म्हणाले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा
By admin | Updated: June 7, 2015 02:44 IST