शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर महासंचालकांच्या बदल्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 03:16 IST

राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक, अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोलीस दलात उत्सुकता निर्माण झालेली आहे. विशेषत: ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदासह मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) व राज्य गुप्तवार्ता (एसआयडी) रिक्त असलेल्या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही पदे महत्त्वाची असल्याने, त्या जागी नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ आहे. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप निर्णय न झाल्याने, ५ ते ६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाइल प्रलंबित असल्याचे गृहविभागातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यात लागू असलेल्या पोलीस बदली (सुधारणा) अधिनियम २०१४ च्या कायद्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याला एका पदावर दोन वर्षे कार्यरत राहण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी पीएसआय ते उपअधीक्षक व अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी काटेकोरपणे केली जाते. त्यावरील अधिकाऱ्यांबाबत हा नियम अपवादात्मकरीत्या वापरला जातो. गृहविभागाने २७ एप्रिलला १६ सहआयुक्त/विशेष महानिरीक्षक, १७ अपर आयुक्त व १०४ उपायुक्त/अधीक्षक दर्जाच्या अशा एकूण १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न झालेल्या ३५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा बदल्यांचा आदेश जारी झाल्यानंतर ४८ तासांत जवळपास २०च्या वर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे फेरआदेश काढण्यात आले. त्यामुळे आता अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यात प्रामुख्याने ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला पूर्ण झाला आहे. मुंबईनंतर महत्त्वाच्या असलेल्या या पदासाठी अनेक इच्छुक आहेत. त्याचबरोबर, संजय बर्वे यांची सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी पदोन्नती झाल्यानंतर, एसआयडीचे आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडेच आहे. त्याशिवाय सीआयडीचे प्रमुख संजयकुमार यांची दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली अपेक्षित आहे, तसेच पुणे, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या पदांसाठीही काहींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर पुण्याचे विभाजन करून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणचे पहिले आयुक्त बनण्यासाठीही अनेक पोलीस अधिकारी ‘प्रयत्न’शील आहेत.१५ निरीक्षकांच्या एटीएसमध्ये बदल्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १५ पोलीस निरीक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय व जिल्ह्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झालेले व इच्छुकांच्या विनंतीवरून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे पोलीस निरीक्षक सध्याच्या ठिकाणांहून कार्यमुक्त होऊन एटीएसमध्ये हजर झाल्यानंतर त्यांची आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांतर्फे काढण्यात आले आहेत. वाढत्या अतिरेकी कारवायांना लगाम घालण्यासाठी एटीएस अधिक सक्षम केले जात आहे. कार्यक्षम अधिकाऱ्यांची या ठिकाणी काम करण्यास निवड केली जात आहे.