शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाख मुलींना सॅनिटरी नॅपकिनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:50 IST

स्मिता योजनेसाठी नोंदणी केलेल्या राज्यातील पावणेतीन लाख शाळकरी मुलींपर्यंत अद्याप सॅनिटरी नॅपकीन पोहोचलेले नाहीत

अण्णा नवथरअहमदनगर : अस्मिता योजनेसाठी नोंदणी केलेल्या राज्यातील पावणेतीन लाख शाळकरी मुलींपर्यंत अद्याप सॅनिटरी नॅपकीन पोहोचलेले नाहीत. ग्रामविकास खात्याने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या या योजनेला सुस्त प्रशासनामुळे खीळ बसत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत योजनेला गती देण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना सोमवारी दिले.अस्मिता योजनेंतर्गत ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींची आॅनलाइन नोंदणी करून त्यांना योजनेचे कार्ड वाटप करण्यात येणार आहे़ त्याआधारे सॅनिटरी नॅपकीन सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुलींची नोंदणी करून त्यांना कार्ड वाटप करण्याचे काम राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत हाती घेण्यात आले आहे़ नॅपकिनसाठी २ लाख ७४ हजार ९९७ मुलींनी नोंदणी केली़ मात्र सॅनिटरी नॅपकिन अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. ११ जूनपर्यंत कामात सुधारणा करण्याचे आदेश देणारे पत्र ग्रामविकासमंत्र्यांनी दिले आहे़जिल्हानिहायमुलींची नोंदणीअहमदनगर- १२, १७२, अकोला-३,८३३, अमरावती-११,५१०, बीड-१४,७३९, भंडारदरा-६,१२३, चंद्रपूर-३,१७७, धुळे-१,९१२, गडचिरोली-१,९१२, गोंदिया-१५,२३७, हिंगोली-११८, जळगाव-५,७२३, जालना-३,५३४, कोल्हापूर-१५,०३५, लातूर-८,५८६, नागपूर-३,३३८, नांदेड-१,८३२, नंदुरबार-८५१, नाशिक-२५,२१०, उस्मानाबाद-२,२९८, पालघर-५,३६८, परभणी-८,१७२, पुणे-१४,३०५, रायगड-७,०१९, रत्नागिरी-२,३५८, सांगली-४,७४६, सातारा-८,४७३, सिंधुदुर्ग-६,३७९, सोलापूर-१८,६३१, ठाणे-३,३९१, वर्धा-४,५०६, वाशिम-३,१२३, यवतमाळ-७,७२४़