शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

एसटीच्या ई-बसला चार महिन्यांची प्रतीक्षा; पहिल्या टप्यात एकूण ५० ई-बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:07 IST

ई-बसचे तिकीट दर शिवनेरीपेक्षा कमी

ठळक मुद्देपुणे, कोल्हापुर, सोलापुर व नाशिक हे मार्गांवर ई-बस सोडण्याचे नियोजनमागील वर्षी जून महिन्यात मुंबईत ई-बसची घोषणा करून ‘शिवाई’ असे केले नामकरणपहिल्या टप्यातील एकूण ५० ई-बसपैकी पुण्याला सर्वाधिक २५ बस मिळणार

पुणे : ईलेक्ट्रिक बसचे मोठ्या दिमाखात लोकार्पण केल्यानंतर एसटी महामंडळाची बस सात महिन्यांनंतरही मार्गावर येऊ शकलेली नाही. त्यासाठी प्रवाशांना आणखी चार महिन्याच्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्यातील एकूण ५० ई-बसपैकी पुण्याला सर्वाधिक २५ बस मिळणार आहेत. पुणे, कोल्हापुर, सोलापुर व नाशिक हे मार्गांवर ई-बस सोडण्याचे नियोजन आहे. मागील वर्षी जून महिन्यात मुंबईत ई-बसची घोषणा करून ‘शिवाई’ असे नामकरण केले. त्यानंतर काही महिन्यांनी खासगी ई-बसची प्रत्यक्ष मुंबई-पुणे मार्गावर चाचणी घेण्यास सुरूवात झाली. पण या चाचणीला विलंब झाला. काही दिवसांपुर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) या बसला हिरवा कंदील दाखविला. पण अद्याप चार्जिंग स्टेशनची उभारणीच झाली नसल्याने या बस प्रत्यक्ष मार्गावर धावू शकत नाहीत. एसटीने पुण्यातील स्वारगेट, नाशिक, सोलापुर व कोल्हापुर याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पुण्याला २५ बस मिळणार असल्याने येथील चार्जिंग स्टेशन जास्त क्षमतेचे असणार आहे. तर उर्वरित तीन शहरातील स्टेशनची क्षमता तुलनेने कमी असेल. या स्टेशनची उभारणी झाल्याशिवाय बस मार्गावर येणार नाहीत. एकीकडे घोषणा करून आठ महिने झाले तरी एसटीची ई-बस मार्गावर येत नसली तरी खासगी ई-बस धावू लागली आहे. याबाबत नुकतीच पुण्यात चारही विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम पुढील तीन महिन्यांत पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात स्वारगेट येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ३३ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी स्टेशनच्या नियोजित जागेपर्यंत आणवी लागणार आहे. मार्केटयार्ड येथून ही वाहिनी जमिनीखालून आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून महावितरणच्या अधिकृत ठेकेदाराला काम दिले जाणार आहे. याप्रक्रियेत तीन महिने जाणार आहे. विद्युत वाहिनीचे काम पुर्ण झाल्यानंतर चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होईल. त्यामुळे एसटीने जून महिन्यात ई-बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती विभागीय वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.  .........ई-बसचे तिकीट दर शिवनेरीपेक्षा कमीएसटीच्या ताफ्यात येणारी ई-बस वातानुकूलित व आरामदायी असणार आहे. सध्या एसटीकडे शिवशाही व शिवनेरी या वातानुकूलित बस आहेत. दोन्ही बसचे तिकीट दर वेगवेगळे आहेत. आता ‘शिवाई’ बसचे तिकीट दरही वेगळे राहणार आहेत. शिवशाहीपेक्षा जास्त पण शिवनेरीपेक्षा कमी असे तिकीट दर प्रस्तावित आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १२५ ई-बस आहेत. पण या बसचे तिकीट सर्वसाधारण बसच्या तिकीट दराएवढेच आहेत. त्यामुळे या बस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणेstate transportएसटीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स