शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 17:51 IST

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी पवारांनी देशासह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

पुणे - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. ४-५ महिने द्या, मला सरकार बदलायचंय. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे तशी धोरणं घेता येत नाही असं मोठं विधान शरद पवार यांनी केले आहे. इंदापूर येथे शेतकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, गेली दहा वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदलले. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हाती दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचे सरकार झाले नसते. त्या दोघांच्या मदतीने आज त्याठिकाणी सरकार झालं. समाजाच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र पुढे घेऊन जायचं ही विचारधारा आपल्या सर्वांच्या अंत:करणात आहे. नेमके त्याविरोधी काम आजचे राज्यकर्ते करतायेत असं त्यांनी म्हटलं.

तसेच मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेत जाऊन यंदाच्या वर्षी ५६ वर्षे झाली. या काळात एकही दिवसाचा खाडा न घेता निवडून आलेला दुसरा कुणी नाही. त्यामुळे या काळात अनेक पंतप्रधान पाहिले. पक्षभिन्नता असेल पण देशाचा विचार कुणी सोडला नाही. समाजातील सगळ्या धर्माच्या, जातीच्या भाषेच्या लोकांबद्दल त्यांना एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय पद्धत समाजातील काही घटकांबद्दल मनामध्ये आकस असावा अशी होती असं सांगत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता निशाणा साधला.

दरम्यान, देशातील राजकारण बदलतंय, गेले १० वर्ष विशिष्ट राजवट देशामध्ये होती. आजही त्यांच्या हाती सत्ता गेलेली आहे. पण १० वर्षाची सत्ता आणि यावेळच्या सत्तेत फरक आहे. देशातील राज्यातील विरोधी पक्षाचे लोक एकत्रित करणे, विरोधासाठी विरोध नाही तर राज्यातील जनतेच्या हिताची जपणूक करणे, जर राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर गप्प बसायचे नाही. लोकशाहीच्या चौकटीत बसून आपली मते मांडायची हे करण्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे. तो उभा करण्याची कामगिरी आम्ही सगळे मिळून करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल