शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाधवान बंधूंचा आता ताबा ‘सीबीआय’कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:07 IST

कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता.

नागपूर : ‘येस बँक’ घोटाळ््याप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले ‘डीएचएफएल’चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांचा रविवारी दुपारी साताऱ्यात ‘सीबीआय’कडे ताबा देण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे दिली. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत हे दोघेही कुटुंबीयांसह आपत्कालीन स्थितीचे कारण देत मुंबईहून महाबळेश्वरला पोहोचले होते. त्यांच्या इतर कुटुंबीयांना ‘होम क्वॉरंटाइन’ करण्यात आले आहे.गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची परवानगी घेऊन वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेले होते. ही बाब समोर येताच त्यांना ‘क्वॉरंटाइन’ करण्यात आले होते. कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता. रविवारी दुपारी ३.३० वाजता साताºयाच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले. सोबतच मुंबईपर्यंत सुरक्षेसाठी पोलीसदेखील दिले, अशी माहिती अनिल देशमुख यांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून दिली.अमिताभ गुप्ता यांनी जे पत्र दिले होते त्याची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे होती. त्यांचा अहवाल रविवारीच प्राप्त झाला. संबंधित पत्र हे गुप्ता यांनी कुठल्याही दबावात न येता स्वत: दिल्याचे चौकशीत कबूल केले होते. या अहवालाची रीतसर फाईल तयार होईल व माझ्याकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यानंतरच अहवालावर निर्णय घेण्यात येईल. हा अहवाल लवकरच आम्ही सार्वजनिकदेखील करू, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणावरुन जे राजकारण करण्यात आले ते दुर्दैवी होते. पत्र कुणाच्या तरी दबावातून देण्यात आले असे तर्कवितर्क लावण्यात आले. राज्य ‘कोरोना’चा सामना करत असताना राज्याचे नेतृत्व केलेले लोकच राजकारण करत असतील ही दु:खद बाब आहे, असे देखील ते म्हणाले.-------------त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदतराज्यातील पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल टाकून ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे. दोन पोलीस कर्मचाºयांचा ‘कोरोना’मुळेच मृत्यू झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. शासनाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एकाला नोकरी व नियमानुसार इतर सहकार्य करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील दोन इस्पितळे पोलीस यंत्रणेसाठी राखून ठेवली आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.