शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘वाढवण’ची भिस्त पर्यावरण प्राधिकरणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 05:38 IST

न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष : सरकारच्या प्रस्तावावर १३ फेब्रुवारीपासून सुनावणी

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डहाणू तालुक्यातील वादग्रस्त वाढवण बंदराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, हे बंदर होऊ न देण्याची प्रमुख भिस्त डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या अस्तित्वावरच आहे. हे प्राधिकरण रद्द करण्याच्या सरकारच्या प्रस्तावावर येत्या १३ फेब्रुवारीपासून सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे.

प्राधिकरण बरखास्तीपासून वाचले, तर बंदर उभारणीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसेल, अन्यथा स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींना सरकारच्या विरोधात टोकाचा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे त्या सर्वांचे डोळे न्यायालयाच्या भूमिकेकडे लागले आहेत.डहाणूच्या पर्यावरण संवर्धनासाठी २३ वर्षांपूर्वी या प्राधिकरणाची स्थापना झाली. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ तज्ज्ञांच्या या समितीने पर्यावरण रक्षणासाठी आजवर मोलाचे योगदान दिले. २०१४ साली वाढवण बंदर उभारणीचे पुन्हा सुरू झालेले प्रयत्न २०१७ साली प्राधिकरणानेच हाणून पाडले. त्यानंतर, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून, केंद्र सरकारने हे प्राधिकरणच रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या. प्राधिकरणाच्या कामकाजासाठी दरवर्षी ५० लाख रुपयांचा खर्च येतो. पर्यावरण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), हरित लवाद (एनजीटी), त्रिसदस्यीय समिती आणि अन्य सरकारी संस्था सक्रिय असल्याने प्राधिकरणाची गरज नसल्याचे सरकारचे दावे आहेत. मात्र, कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट आणि वाढवण बंदर विरोध संघर्ष समितीने त्यावर आक्षेप नोंदविले आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ गायत्री सिंग आणि त्यांच्या सहायक मिनाझ ककालीया न्यायालयात त्यांची बाजू मांडत आहेत.

...नव्हे खर्चाला मान्यतागेल्या आठवड्यात या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यास केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. जोपर्यंत प्राधिकरणाचे अस्तित्व कायम आहे, तोपर्यंत त्यांनी फेटाळलेल्या वाढवण बंदराला मंजुरी देण्याचे अधिकार केंद्र सरकारला नाहीत, परंतु प्राधिकरण बरखास्त करून हा प्रकल्प पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते हाणून पाडण्यासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न केले जातील, असे ककालीया यांनी स्पष्ट केले.प्राधिकरणाला एमपीसीबी आणि एनजीटी हे पर्याय ठरूच शकत नाहीत. त्यांचे काम सर्वश्रुत आहे. एनजीटीवर तर तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्त्या सरकारला करता आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून पर्यावरण संवर्धन होणार नाही. त्यामुळे डहाणूसाठी नेमलेले प्राधिकरण रद्द करू नये, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करून १३ तारखेला सर्व पक्षकरांना त्या दिल्या जातील आणि त्याच वेळी सुनावणीची तारीख कळेल. - अ‍ॅड. मिनाझ ककालीया

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार