शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'आयसीयू'तील मतदार ॲम्ब्युलन्समधून थेट मतदान केंद्रावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:13 IST

उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणूक; एकतर्फी सामना अंतिम टप्प्यात ‘टफ’

कळंब (जि. उस्मानाबाद) : जिल्हा बँक निवडणुकीचा एकतर्फी वाटणारा सामना अंतिम टप्प्यात मात्र चुरशीचा ठरला आहे. यातच सौंदना अंबा येथील अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका रुग्ण मतदाराने थेट कार्डियाक ॲम्ब्युलन्सने मतदान केंद्र गाठले अन् मतदानाचा हक्क बजावला.    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. कळंब तालुक्यात तर भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडी असेच चित्र दिसून येत होते. यामुळेच सोसायटी मतदारसंघातील ७० व इतर संस्था मतदारसंघातील ६० अशा एकूण १३० मतदारांना चांगलाच भाव आला होता. यात सरळसरळ लढत होत असल्याने दोन्ही बाजूने काही मतदारांना ‘सहल’ घडवली होती, तर काही मतदार वैयक्तिक अडचणी सांगत घरीच थांबले होते. या स्थितीत रविवारी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा हा सामना एकतर्फी न होता बिग फाइट असल्याचे दिसले. यातच अचानक सायरन वाजवत एक ॲम्ब्युलन्स मतदान केंद्र असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात दाखल झाली. यामध्ये कोण होते? तर सौंदना अंबा (ता. कळंब) येथील सोसायटी मतदारसंघातील मतदार होते. 

आयसीयूमधून आले, पण मतदान केलेच... सौंदना, लासरा व वाकडी (इस्थळ) या तीन गावची ग्रुप सोसायटी आहे. या संस्थेचा बँक निवडणुकीसाठी मधुकर भाऊराव पालकर यांच्या नावे ठराव होता. मात्र, निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. यानंतर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या स्थितीत त्यांनी रविवारी दुपारी ॲम्ब्युलन्समधून कळंब गाठले अन् मतदान केले. 

मतदान केंद्र अधिकारीही रुग्णवाहिकेत     मतदानासाठी थेट ॲम्ब्युलन्सने कळंब येथील मतदार केंद्रावर दाखल झाल्यानंतर मतदान केंद्र अधिकारी, सहायक मतदान अधिकारी अशा कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी इमारतीमधून खाली येत ॲम्ब्युलन्स गाठली. याठिकाणी त्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे पालकर यांना मतदानाचा हक्क बजावता आला.

टॅग्स :ElectionनिवडणूकOsmanabadउस्मानाबाद