शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मतदारांचा ईव्हीएमवर संताप; बिघाडसत्रामुळे मतदान न करताच परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 09:12 IST

जालन्यातील टाकळी अंबड येथे गेल्या दीड तासापासून मतदान यंत्र बंद आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 14 मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. यामुळे अनेकजण मतदान न करताच माघारी परतल्याचे चित्र दिसत आहे. 

 जालन्यातील टाकळी अंबड येथे गेल्या दीड तासापासून मतदान यंत्र बंद आहे. औरंगाबाद येथील बुथ क्रमांक 211, 210 आणि 161 वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर 20 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले. 

माढ्यामध्ये सर्वाधिक बिघाडाच्या तक्रारीमाढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 158,160 वरील मशीन बंद होते. याच मतदारसंघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर 1 येथील मतदान केंद्र 140 मधील मशीन एक तास झाले बंद पडले होते. यामुळे मतदार खोळंबून निघून गेले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र 155 मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. तर भीमनगर येथे मतदान केल्यानंतर मशीनचे बटन दाबले जात नव्हते त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती.

औरंगाबादमधील मतदान केंद्र क्रं.222, 219 वरील मशीन तासभर सुरू न झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. डोकेवाडी ( ता.श्रीगोंदा ) मतदान केंद्रावर अर्धा तास उशीरा मतदान सुरू. ईव्हीएम बंद पडले होते. तर कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरूच झालेल्या नसल्याने मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सातारातील जवळवाडी ( मेढा) येथे मतदान मशिन नादुरूस्तीमुळे ४५ मिनिटे उशिराने मतदानाला सुरूवात झाली. चोपडा तालुक्यात दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले. 

अलिबाग विधानसभा मतदार संघात थळ चाळमळा साई मंदिर मतदान केंद्र मशीन बिघडल्यामुळे सकाळी 9 वाजता मतदान सुरु झाले आहे. तर सांगलीत गुजराती हायस्कुलमध्ये मशिन बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला.  तासभर वाट पाहून पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकजण मतदान न करता माघारी परतले. 

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019madha-pcमाढाsangli-pcसांगली