शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

आगळय़ावेगळय़ा विचाराचे स्वयंसेवक

By admin | Updated: June 4, 2014 01:16 IST

गोपीनाथ मुंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पण नागपुरात क्वचितच कुणी त्यांना अध्र्या चड्डीत पाहिले असेल.

मोरेश्वर बडगे - नागपूर
गोपीनाथ मुंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पण नागपुरात क्वचितच कुणी त्यांना अध्र्या चड्डीत पाहिले असेल. दिल्लीचे नेते नागपुरात येतात तेव्हा संघ मुख्यालयात हमखास जातात, मुंडे क्वचितच गेले असतील. पण म्हणून संघ विचारावरची त्यांची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नव्हती. प्रमोद महाजनांमुळे गोपीनाथ मुंडे यांचा संघाशी संबंध आला. तसे पाहिले तर वेगळ्या विचाराचे स्वयंसेवक होते.   नागपुरात तसेही मुंडे फार येत नसत. विधानसभा अधिवेशनानिमित्ताने त्यांचे येणो होई. पुढे ते दिल्लीला गेले तेव्हा नागपुरात येणो आणखी कमी झाले. पण जेव्हा केव्हा नागपुरातल्या खास बैठकीत संघाचा विषय निघे तेव्हा मुंडे मनातले सारे ओकून मोकळे होत. संघाने आपले हेडक्वार्टर दिल्लीला हलवावे, म्हणजे मोठी लढाई खेळता येईल, असे त्यांनी एकदा बोलून दाखवले होते.  
प्रत्येक पुढा:याचे काही खास लोक प्रत्येक मोठय़ा शहरात असतात. मुंडेंचे नागपुरात भाजपामध्ये असे खास कुणी नव्हते. विशेष प्रसंगी पदाधिकारी स्वागताला यायचे तेवढेच. मात्र खा. अजय संचेती घराण्याशी त्यांचे जुने घरोब्याचे संबंध होते. मुंडे नागपुरात येत असले की, संचेती स्वत: वापरतात ती गाडी त्यांना घ्यायला जायची. मुंडेंची नागपुरात बैठक असायची असे आणखी एक ठिकाण म्हणजे डॉ. विलास डांगरे. गप्पा झाल्यावर स्वत:साठी औषध सोबत घ्यायला मुंडे विसरत नसत.  
नितीन गडकरींशी मुंडेंचे जमत नव्हते. कधी जाहीरपणो तर कधी फोनवर हे दोघे भांडताना अनेकांनी पाहिले आहे. पण या माणसाची ब्यूटी पाहा. मध्यंतरी मुंडे राजीनामा द्यायला निघाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भाचे बहुसंख्य आमदार मुंडेंच्या  पाठीशी उभे राहिले होते. मुंडे मनात काही ठेवत नसत. भांडून मोकळे होत. एकदा ते म्हणालेही, ‘भविष्यात मी व गडकरी एवढे जिगरी दोस्त होऊ की तुम्हीही तोंडात बोटं टाकाल.’ 
शेतकरी आत्महत्या, भारनियमन असूनही विदर्भातले शेतकरी काँग्रेसला मतं टाकत तेव्हा मुंडे कमालीचे संतापत. अलीकडे हवा बदलल्याने ते खुशीत होते. गेल्या अधिवेशनकाळात नागपूरला मुंडे आले, तेव्हा ‘लोकमत’ला आले होते. निघताना सहज मुंडे म्हणाले, ‘पुढच्या खेपेला ‘रामगिरी’वर भेटू.’ आता ती भेट होणो नाही़़़