शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नाही, पूजाच्या वडिलांचा दावा, बदनामी थांबविण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:36 IST

Pooja Chavan Suicide Case: परळी शहरातील देशमुख पार येथे पूजा चव्हाण आपल्या आई वडिलांसह राहत होती. तिच्या वडिलांचे परळीपासून जवळच असलेल्या वसंतनगर तांडा येथे पोल्ट्री फार्म आहे.

परळी (जि. बीड) : पूजा चव्हाणआत्महत्याप्रकरणात तिचे वडील लहू चव्हाण यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. परळी शहरातील देशमुख पार येथे पूजा चव्हाण आपल्या आई वडिलांसह राहत होती. तिच्या वडिलांचे परळीपासून जवळच असलेल्या वसंतनगर तांडा येथे पोल्ट्री फार्म आहे. गेल्या तीन वर्षांपासून पूजानेही स्वतः पोल्ट्री फार्म उघडला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यात नुकसान झाले, त्याचा ताण पूजावर होता, असे लहू चव्हाण यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी ती पुण्याला गेली होती. तिला मोठे व्हायचे होते. परंतु अचानक तिचा मृत्यू झाला. याबाबत आपली कुणाविषयी शंका नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, तिच्या मृत्यूमुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असेही ते म्हणाले. पूजाला पाच बहिणी आहेत. पूजा ही सर्वात कणखर होती. आमच्या कुटुंबाचा तीच आधार होती, असे सांगत लहू चव्हाण यांनी माध्यमांद्वारे पूजाची होत असलेली बदनामी थांबविण्याचे आवाहन केले. कर्जाचा ताण घेऊ नको, आपण कर्ज घेऊ असे तिला समजावून सांगितले होते, असेही ते म्हणाले.  बंजारा समाज कोर्टात जात नाही. एखाद्या प्रकरणाचा निर्णय मुख्य नाईक घेतात. तसेच पूजाच्या मृत्यूप्रकरणी जे सत्य बाहेर येईल ते सर्वांना मान्य असेल, असेही (पान १० वर)

पोलिसांवर दबावनागपूर : या प्रकरणातील ‘ऑडिओ क्लिप्स’ एकदम स्पष्ट आहेत. त्यातील आवाज कुणाचा आहे, हेदेखील सर्वांना माहिती आहे. मात्र पोलिसांनी गंभीरतेने कारवाई केलेली नाही. पोलिसांवर कुठला तरी मोठा दबाव आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दोषारोप करणे योग्य नाही - थोरातया प्रकरणात चौकशी होईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे तोवर  यासंदर्भात कुणावरही दोषारोप करणे योग्य नाही, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSuicideआत्महत्या