शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

पिवळं लुगडं नेसून सिंगापूरला लेकाचं ऑफिस पाहिलं; आईला ‘फॉरिन’ला नेणाऱ्या दत्तात्रयची संघर्ष यात्रा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 6:31 PM

मी सगळ्यांना एकच सांगतो, आपलं नवीन जग, विदेश आपल्या पालकांनाही दाखवा, त्यांना होणारा आनंद मोजता नाही येणार!’

बीड जिल्ह्यातलं भोगलगाव ते सिंगापूर, शेतमजुरी ते ब्लॉकचेन हा प्रवास दत्तात्रय जाधवसाठी सोपा नव्हता. पण, तो करतानाच त्याच्या मनात होतं की, आपण जी काही प्रगती करू त्यात आपलं कुटुंब, आपली आई आपल्यासोबत हवी. तो दहावीत असतानाच वडील गेले, पण भाऊ, आई यांच्या साथीनं त्यानं आपल्या जगण्याला मेहनतीची चाकं लावली. आज ब्लॉकचेन तज्ज्ञ असलेला दत्तात्रय सिंगापूरमध्ये नोकरी करतो आणि ‘फॉरिन’ नावाचं फक्त ऐकलेलं ते जग आपल्या आईनंही पाहावं म्हणून तो आईला सिंगापूरला घेऊन गेला, त्याचसंदर्भात त्यानं लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली.

लिंकडीन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या लहानशा पोस्टमध्ये दत्तात्रय म्हणतो, लहानशा खेड्यात आईनं आयुष्यभर कष्ट केले. तिनं कधी विमान पाहिलं नव्हतं, आता विदेशातलं लेकाचं जग, ऑफिस पाहून तिच्या नजरेत अभिमान, आनंद आहे. मी सगळ्यांना एकच सांगतो, आपलं नवीन जग, विदेश आपल्या पालकांनाही दाखवा, त्यांना होणारा आनंद मोजता नाही येणार!’

पिवळं लुगडं नेसून सिंगापूरला लेकाचं ऑफिस पाहायला गेलेली आई आणि तिचा प्रेमळ लेक अर्थात सोशल मीडियात व्हायरल झाला. दत्तात्रयशी ‘लोकमत’ने संपर्क केला तर तो म्हणाला भोगलगावातले दिवस आठवतात मला अजूनही. चार एकर जमीन, वडील-भाऊ-आई शेतमजुरी करीत, गोदावरीला पाणी नाही, पाऊस नाही. मला एकच माहिती होतं की ही परिस्थिती बदलायची तर मला मेहनत, अभ्यासच करायला हवा. बीसीएस केलं औरंगाबादला, काही क्लासेस लावले हैदराबादला आणि मला चांगली नोकरी मिळाली. पण, आईला तेव्हा हैदराबादलाही नेता आलं नाही. पण, पुढे पुण्यात नोकरीला लागलो आणि मी आईला सोबत घेऊन गेलो. पुतण्या शिकायला आला. मनात एकच होतं, सुखाचे दिवस आले तर आईसोबत हवीच. पत्नीही मला समविचारी मिळाली आणि सिंगापूरला नोकरी लागली आणि इथं स्थिरावताच मी आईला सिंगापूरला घेऊन आलाे.’

दत्तात्रय ब्लॉकचेनसह हॅकिंग विषयातला तज्ज्ञ आहे. त्यानं आजवर अनेक हॅकॅथॉन जिंकले आहेत. शेतकऱ्यांचं जगणं सुकर व्हावं म्हणून काही सॉफ्टवेअर बनविण्याचे त्याच्या मनात आहे. दत्तात्रय म्हणतो, आपली प्रगती, आपलं बदललेलं जग आणि त्याचा आनंद आई-वडिलांच्या डोळ्यांत पाहण्यासारखा आनंद नाही.

टॅग्स :singaporeसिंगापूरITमाहिती तंत्रज्ञान