शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व्हिजन झीरो प्रोजेक्ट राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 02:21 IST

सेव्ह लाइफ फाउंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुपच्या सहकार्याने व्हिजन झीरो प्रोजेक्टचा शुभारंभ

मुंबई : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सेव्ह लाइफ फाउंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुपच्या सहकार्याने व्हिजन झीरो प्रोजेक्टचा शुभारंभ शुक्रवारी केला. यामुळे या मार्गावरील अपघातांमध्ये नक्कीच घट येईल, असा दावा करण्यात येत आहे.मुंबई-पुणे (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) हा सर्वाधिक रहदारीचा आणि दोन्ही बाजूंना नागरी वस्ती असलेला महामार्ग आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून हा महामार्ग ओळखला जातो. या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एमएसआरडीसी यांच्यासोबत सेव्ह लाइफ फाउंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुप, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गृह विभाग यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर व्हिजन झीरो प्रोजेक्टचा शुभारंभ केला.या उपक्रमाची मुहूर्तमेढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिवर्तन अभियानांतर्गत फेब्रुवारी २०१९ मध्ये रोवली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी महामंडळाचे मॉडेल देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर राबविले गेले पाहिजे, असे स्पष्ट केले. या वेळी अप्पर पोलीस महासंचालक (महामार्ग पोलीस) विनय करगांवकर म्हणाले, रस्त्यावरील ८० टक्के अपघात हे मानवी चुकीमुळे होतात. अपघात रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी होईलच; पण, प्रत्येक वाहनचालकाला स्वत:हून वाटले पाहिजे की, कुठल्याही अपघाताला मी कारण नसेन. लोकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे.महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले, अपघात रोखण्यासाठी आवश्यक तेथे अभियांत्रिकी उपाय करण्यात येतील. कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण त्याची अंमलबजावणी कठोरपणे करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघात