शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विसर्जनानंतर काही मिनिटांतच गणेशमूर्ती शेडमध्ये, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 22:06 IST

गणेश विसर्जनानंतर केवळ काही मिनिटे मूर्ती हौदात ठेऊन नंतर बाजुच्या पत्र्याच्या  ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील विसर्जन हौदावर होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला आहे.

युगंधर ताजणे /तन्मय ठोंबरे 

पुणे :  गणेश विसर्जनानंतर केवळ काही मिनिटे मूर्ती हौदात ठेऊन नंतर बाजुच्या पत्र्याच्या  ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील विसर्जन हौदावर होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला आहे. महापालिकेतर्फे नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून  हे कृत्य केले जात असल्याचे दिसून आले आहे. 

पुणे महापालिकेच्या वतीने पाचव्या दिवसाच्या विसर्जनाची शहरातील अनेक घाटांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणातही विसर्जन हौद आहे.   सकाळपासून परिसरातील भाविकांची श्रींच्या विसर्जनाकरिता त्या हौदावर गर्दी सुरु होती. दुपारी चारच्या दरम्यान मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जनस्थळी येऊ लागले. भाविक मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने श्रींची आरती करुन, त्यांना भावपूर्ण निरोप देत होते.  हौदाच्या बाहेर उभ्या असलेले कर्मचा-यांकडे ते मुर्ती देत. मात्र भाविकांनी पाठ फिरविल्यानंतर ते क र्मचारी मोठ्या शिताफीने ती मुर्ती हौदाच्या बाजुस असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये  ठेवत होते. 

हौदाजवळ तैनात असलेल्या एका कर्मचा-याला यासंबंधी विचारले असता त्याने हौदात मूर्तींची गर्दी होते. तिला पाय लागतो. भाविकांना ते आवडत नाही. यामुळे पुन्हा मूर्ती बाहेर काढून ठेवतो. त्यानंतर सर्व मुर्त्यांना एकत्रित पध्दतीने विसर्जित करतो,  असे सांगितले. मात्र, भाविकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मूर्तींचे पुन्हा विधिवत विसर्जन होईल, का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

पत्र्याच्या शेडमधील मुर्तीविषयी विचारल्यावर मात्र बोलण्यास टाळाटाळ करत होते. यावर अनेकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.   एकाच हौदाभोवती पाच ते सहा कर्मचारी उभे होते. भाविकाने मुर्ती त्यांच्या हाती दिल्यानंतर तातडीने ती मुर्ती बाजुच्या सहका-याकडे देणे, त्याने ती आपल्या शेजारच्या सहका-याकडे ती सोपविणे आणि सर्वात शेवटच्या कर्मचारी अत्यंत सावधपणे, कुणालाही काही कळु न देता त्या श्रींच्या मुर्तीला पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत होता. 

विसर्जनासाठी भाविकांकडून गणेशमूर्ती आमच्याकडे सोपविल्या जातात. त्या पाण्यात विरघळेपर्यंत आम्ही ठेवतो. एकाच हौदात सगळ्या मूर्ती बसणे शक्य नाही. म्हणून त्या बाजुला ठेवतो. नंतर पुन्हा त्या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी ठेवतो. - विसर्जनस्थळावरील एक कर्मचारी 

व्हिडीओ - 

 

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका