शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

‘कोपर्डी’च्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये विराट मोर्चा

By admin | Updated: August 10, 2016 04:46 IST

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाने मंगळवारी येथे विराट मोर्चा काढत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली

औरंगाबाद : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाने मंगळवारी येथे विराट मोर्चा काढत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नसताना अन्यायी घटनेच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले. ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या नावाने झालेल्या आंदोलनात तब्बल पावणेदोन लाख मराठा बांधव सहभागी झाले होते.‘आमच्या पोरीची अब्रू इतकी स्वस्त कशी...? कोपर्डीच्या नराधमांना तात्काळ फाशी..’ अशा भावना व्यक्त करणारे फलक लोकांनी हातात घेतले होते. क्रांतीचौकातून सकाळी ११ वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. तेथून पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, सराफा रोड, शहागंजमार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. समाजातील विविध क्षेत्रातील, वयोगटातील महिला, पुरुष तसेच तरुण यात सहभागी झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. विभागीय आयुक्तालयावर मोर्चा पोहोचला तेव्हा त्याचे शेवटचे टोक क्रांतीचौकात होते. सर्व मोर्चेकऱ्यांनी काळा पोषाख परिधान केला होता. कोणी डोक्याला तर कोणी दंडाला काळी फीत बांधली होती. शेकडो युवक-युवतींच्या हातात फलक होते. त्यावर ‘फास्ट-ट्रॅक कोर्टाचा उपयोग करा...नराधमांना फाशी द्या’, ‘अन्यायाविरुद्ध करू या बंड...कोपर्डीच्या गुन्हेगारांना मृत्युदंड’, ‘कोपर्डीच्या आरोपींची शिक्षा काय...तोडून टाका हात पाय’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. कोणी भगवे झेंडे तर कोणी काळे झेंडे हातात घेतले होते. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाचे जाहीर वाचन करण्यात आले. क्रांतीदिनी निघालेल्या मोर्चातून मराठा समाजाने ‘महिलांवरील अत्याचाराला’ चले जाव म्हटले. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला ‘मी एकटी नाही’. माझ्या पाठीशी समाज भक्कमपणे उभा आहे, असा संदेश दिलेला असल्याचे अश्विनी भालेकर यांनी निवेदनातून सांगितले. कोमल औताडे या तरुणीने मागण्यांचे वाचन केले. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्वांनी कोपर्डी हत्याकांडातील निष्पाप मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सामूहिक राष्ट्रगीत म्हणून मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)