शिर्डी (जि. अहमदनगर) : साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने व्हीआयपींच्या दर्शन व आरती पासच्या शुल्कात १ मार्चपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे संस्थान भक्तनिवासात राहणाऱ्या किंवा प्रसादालयात व्हीआयपी कक्षात भोजन घेणाऱ्या भाविकांना शिफारशीशिवाय दर्शन, आरती पासेस मिळणार आहेत, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली़संस्थानने १ मार्चपासून दर्शन व आरतीच्या पासासाठी प्रती व्यक्ती दर्शनासाठी दोनशे, काकड आरती सहाशे, तर मध्यान्ह, धुपारती व शेजारतीसाठी चारशे रुपये मोजावे लागणार आहेत़ (प्रतिनिधी)
व्हीआयपींचे साईदर्शन महागले
By admin | Updated: February 27, 2016 02:02 IST