शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

भारत बंदला राज्यात हिंसक वळण; धुळ्यात गोळीबार, विदर्भात लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:40 IST

विदर्भात यवतमाळ, व-हाडात अकोला, वाशीम, खान्देशात जळगाव, धुळे, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली-मिरज येथे अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

मुंबई : नागरिकत्व कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चा आणि अन्य संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. धुळ्यात जमावाने दगडफेक केल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करुन अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत दोन पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस शिपाई जखमी झाले. विदर्भात यवतमाळ, व-हाडात अकोला, वाशीम, खान्देशात जळगाव, धुळे, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली-मिरज येथे अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

गडचिरोलीत ग्रामीण भागात परिणाम नाहीगडचिरोली : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात विविध पक्षांच्या वतीने आयोजित भारत बंदला गडचिरोली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र ग्रामीण भागात मात्र या बंदचा परिणाम जाणवला नाही. गडचिरोली बहुजन क्रांती मोर्चा या सर्वपक्षीय संघटनेच्या पुढाकाराने गडचिरोलीत बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळपासून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बंदच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून सरकारच्या धोरणावर आसूड ओढले.व-हाडात गालबोटअकोला : ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले. अकोल्यातील पातुरात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत रेस्टॉरंट, बस व खासगी वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला व दहा आंदोलकांना ताब्यात घेतले. वाशिमधील कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर दगडफेक तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने या दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि शेगाव येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. यात शेगाव येथील एका दुकानावर दगडफेक झाली तर सोनाळा बसस्थानक परिसरात झालेल्या वादात एक जण जखमी झाला आहे.पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजंूना वाहतुकीची कोंडी झाली होती. या दरम्यान, काही आंदोलकांनी अचानक दगडफेक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या, तर बिकानेर रेस्टॉरंटचेही नुकसान झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा व रिसोड शहरात दगडफेक झाली. कारंजात तणावपूर्ण शांतता आहे.मराठवाड्यात संमिश्र प्रतिसादऔरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड आणि हिंगोलीत बंदला गालबोट लागले. औरंगाबादमध्ये बळजबरी बस थांबविणाºया आंदोलकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करीत त्यांच्या हातातील व्हिडिओ कॅमेºयाची तोडफोड केल्याची घटना दिल्लीगेट येथे घडली. हर्सूल टी पॉर्इंट, सिटीचौक आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात एका दुकानावर दगडफेक केल्यामुळे परिसरात तणाव होता़ जालना, बीड शहरातील प्रमुख बाजारपेठेतील अनेक दुकाने दुपारपर्यंत बंदच होती. उस्मानाबाद, कळंब शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर लोहारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ भूम व वाशी तालुक्यातील पारगाव बाजारपठ सुरळीत सुरू होती़ लातूर शहरासह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणी शहर आणि पाथरीत बाजारपेठ कडकडीत बंद होती.

खान्देशात हिंसक वळणजळगाव : खान्देशात धुळ्यासह जळगाव, भुसावळ येथे बंदला हिंसक वळण लागले. धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर रास्तारोको आंदोलन होत असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत आंदोलन मिटविले आणि जमावाला पांगविले़त्याच दरम्यान पश्चिम हुडको भागातील पवननगर परिसरात पोलीस स्टेशनच्या समोरील चौकात रिक्षा आणि दुचाकीचा किरकोळ अपघात झाला़ अपघाताच्या ठिकाणी जमाव जमला़ हा जमाव हटवित असताना कोणीतरी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकाविला़ वातावरण तणावपूर्ण होताच पोलिसांची कुमक बोलाविण्यात आली़ क्षणार्धात दगड, विटा आणि काचेच्या तुकड्यांचा खच चौकात झाला होता़ अशातच पोलिसांच्या दोन दुचाकी, नादुरुस्त कार देखील जमावाकडून जाळण्यात आली़ परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि पोलीस कर्मचारी यांनी प्रत्येकी दोन राऊंड हवेत गोळीबार केला़ तर ६ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत दोन पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस शिपाई जखमी झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे