शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हिंसक आंदोलन, फडणवीसांच्या 'त्या' विधानामुळे मनोज जरांगे संतप्त, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 19:43 IST

Manoj Jarange Patil Criticize Devendra Fadnavis: तुम्हाला कलम ३०७ दाखल करायचं आहे ना, करा. तुम्ही ३०७ चे किती गुन्हे दाखल करता, तेच बघायचं आहे. दांडका घेऊन आलात तर आम्हालाही मर्यादा ओलांडावी लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. तर राज्यभरात मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. यादरम्यान, काल बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागून काही लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ करण्यात आली होती. त्या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे, पण हिंसा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा लोकांवर पोलिसांकडून कलम ३०७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलंय. तुम्हाला कलम ३०७ दाखल करायचं आहे ना, करा. तुम्ही ३०७ चे किती गुन्हे दाखल करता, तेच बघायचं आहे. दांडका घेऊन आलात तर आम्हालाही मर्यादा ओलांडावी लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील हिंसक आंदोलनाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत घरे जाळणाऱ्यांवर कलम ३०७ कलम लावण्याच्या दिलेल्या इशाऱ्याबाबत  विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं. कशाला बोलता आम्हाला. ही घरं कुणी जाळली तुम्हाला माहिती आहे काय? मराठ्यांनी जाळली की कुणी जाळली हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचीच लोकं घुसवता आणि तुम्हीच जाळता आणि तुम्हीच आम्हाला ३०७ शिकवता. तुमच्यासारख्या बढाया मारणाऱ्या नेत्यांमुळेच भाजपा विविध राज्यात रिव्हर्स आलाय, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. 

जरांगे पुढे म्हणाले की, ३०७ करीन आणि आणखी काय करीन, कशाला धमक्या देताय.करा तुम्हाला काय करायचं ते? तुम्ही ठरवलंच आहे ना राज्यात अशांतता निर्माण करायचं, त्यामुळे तुमची बुद्धी जेवढी आहे तेवढंच तुम्ही बोलणार आहे. तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण द्या नाहीतर मराठ्यांचा नाईलाज आहे. त्याला पर्याय नाही. आता आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघू. आमचं पाणी सुटलं की, आंदोलन शांततेत राहणार, पण तुम्ही किती ताकदवान आहात आणि किती कलम ३०७ लावता हे आम्हाला बघायचंच आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण