शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:04 IST

पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुंबई/नागपूर : नागपुरात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. दरम्यान, सोमवारी सायंकाळनंतर महाल, हंसापुरी भागात झालेल्या दोन गटांमधील संघर्षानंतर मंगळवारी संपूर्ण नागपुरात तणावपूर्ण शांतता होती. शहरातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नागपूरच्या हिंसाचारावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले. एका उपायुक्तावर तर कुऱ्हाडीने हल्ला झाला. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तर प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात, धर्म न पाहता कारवाई केली जाईल.

काही झाले तरी त्यांना सोडण्यात येणार नाही : फडणवीस११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच, एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडण्यात येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल : एकनाथ शिंदेनागपूरमध्ये आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत केले होते. मात्र, काही तासांत लगेचच दोन-पाच हजाराचा मॉब कसा जमला. घरात मोठे दगड टाकले. हॉस्पिटलची तोडफोड केली. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. दंगेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले. वाहनेही जाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणी शंभर - दीडशे बाइक पार्क व्हायच्या पण काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ हे नियोजनपूर्वक षडयंत्र होते. या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस