शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Vinayak Mete Accident: मंत्रालयातून दोन फोन, कार्यकर्त्यांना विचारले मुंबईला जाऊ की नको, अन्...; विनायक मेटे वाचले असते, कार्यकर्ते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:44 IST

Vinayak Mete Accident: विनायक मेटे यांचे पार्थिव जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या वडाळा भक्ति पार्क येथील निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी त्यांच्या मृतदेह बीडला नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झाले आहे. विनायक मेटे होते, म्हणून आम्ही होतो, ते नाहीत आम्ही शून्य झालो, अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंच्या मोठ्या वहिणींनी दिली. शनिवारीच ते बीडमधील मोठ्या भावाच्या घरी होते. रविवारी बीडमध्ये शिवस्वराज्यची तिरंगा रॅली होती. त्याच दिवशी ते आईला भेटून आले होते, असे त्या म्हणाल्या. 

मेटे यांच्या घरी नातेवाईकांची येजा वाढू लागली आहे. कार्यकर्ते देखील जमू लागले आहेत. मेटे यांच्यासोबत असलेला पोलीस अंगरक्षक देखील बीडचाच आहे. ते देखील गंभीर जखमी आहेत. मृत्यूशी झुंजत आहेत. असे असताना मेटे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मेटे मुंबईला गेले नसते तर वाचले असते अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

काल मेटे आमच्यासोबतच होते. मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून विनायक मेटेंना दोन फोन आले. तुम्हाला तातडीने मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीला यायचे आहे, असा निरोप होता. रविवारी बीडमध्ये तिरंगा यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामुळे मेटे बीडमध्येच असणार होते. परंतू, मराठा आरक्षणाची बैठक असल्याने त्यांना जावे लागले. मेटेंनी मुंबईला जाऊ की नको, असे आम्हाला विचारले होते. परंतू आम्हीच त्यांना तिरंगा रॅली यशस्वी पार पाडू, असे आश्वासन दिले आणि मुंबईला जाण्यास सांगितले यामुळे ते निघाले, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. विनायक मेटेंच्या मातोश्री लोचनाबाई मेटे या राजेगावयेथून बीडला यायला निघाल्या आहेत. केज तालुक्यातील राजेगाववर शोककळा पसरली आहे. 

विनायक मेटे यांचे पार्थिव जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या वडाळा भक्ति पार्क येथील निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी त्यांच्या मृतदेह बीडला नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

शिवसंग्राम भवनपासून निघणार अंत्ययात्राविनायक मेटे यांचे पार्थिव   मुंबईहून शिवसंग्रामला १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता आणण्यात येईल. त्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAccidentअपघात