शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गाव तसं चांगलं... पण दारूनं झिंगलेलं

By admin | Updated: June 8, 2016 20:21 IST

गावात बुधवारी सकाळी महिलांची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. निमित्त होते गावात खुलेआम होणारी दारूविक्री. या गावाची जवळपास दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे

दारूबंदीसाठी महिला सरसावल्या : सुपे खुर्दच्या ग्रामसभेत बंदीच्या ठरावावर १३८ महिलांच्या सह्यानारायणपूर : सुपे खुर्द (ता. पुरंदर) या गावात बुधवारी सकाळी महिलांची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. निमित्त होते गावात खुलेआम होणारी दारूविक्री. या गावाची जवळपास दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. या छोट्याशा गावात मात्र चार ठिकाणी खुलेआम दारूविक्री अगदी पहाटेपासून सुरू होते. ती रात्री उशिरापर्यंत चालू असते. त्यामुळे गावातील ज्यांचे शिक्षणाचे वय आहे, ते या दारूच्या आहारी जाऊ लागल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली आहे. या दारूमुळे गावातील चार जण गंभीर आजारी पडले असून ते उपचार घेत आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून सुपे खुर्दच्या महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार केला. गावात विशेष ग्रामसभेची मागणी केली. महिलांसाठी ही सभा घेण्यात आली. या वेळी जवळपास १३८ महिलांनी दारूबंदीच्या ठरावावर सह्या केल्या आणि दारूबंदीही कायमची झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. उपसरपंच दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी ग्रामसेविका आर. पी. भोंडे, सदस्य विश्वास काटकर, बाळासाहेब जगताप, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबन चव्हाण, रेखा जगताप, अंजना जगताप, विजया म्हेत्रे, संगीता गायकवाड, पुष्पा म्हेत्रे, नंदा मंडले, सविता भोंडे, आशा चव्हाण, शकिला शेख, मंगल पवार, पुष्पा आंबुले, नूतन जगताप, सारिका राऊत, शांताबाई म्हेत्रे, जयश्री जगताप, चैत्राली जगताप, छबुबाई क्षीरसागर, शिवाजी पवार, अंकुश जगताप, राजेंद्र जगताप, संतोष जगताप, मधुकर जगताप, रोहिदास जगताप, सुमित्रा जगताप, शालन आंबुले, उज्ज्वला राऊत, शोभा शिवतारे आदी महिलांनी ठरावाच्या बाजूंनी सह्या केल्या. या ठरावास सूचक संजीवनी जगताप, तर अनुमोदन कांताबाई जगताप यांनी दिले.याप्रसंगी महिलांनी सांगितले, की लहान वयातच मुलांना दारू पिण्याचा नाद लागला आहे. दारू पिण्यासाठी ही मुले घरातील भांडी, चीजवस्तू विकत आहेत. तसेच आई-वडिलांनी मोलमजुरी करून मिळविलेल्या पैशांची ही मुले चोरी करीत आहेत. तसेच पैसे दिले नाहीत तर आई-वडिलांना घराबाहेर काढण्यासही ही मुले मागे-पुढे पाहत नाहीत. गावात जुगार खेळण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. गावातील शाळेत जाणूनबुजून घाण करतात. महिला, मुलींना त्रास देतात. यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तीन किलोमीटर चालत येऊन दिले निवेदनगावाच्या हद्दीत पानवडी घाटाच्या पायथ्याला एक ढाबा, गावात किराणामालाच्या दुकानात, तसेच एक गावठी दारूविक्री ठिकाण आहे. स्मशानभूमीशेजारी एक ढाबा या ठिकाणचे सर्वच दारूधंदे कायमचे बंद व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दारूबंदीचा ठराव झाल्यावर या सर्व महिला सुपे खुर्द ते सासवड तीन किलोमीटर चालत येऊन पुरंदरचे तहसीलदार, सासवड पोलीस ठाणे, राज्यमंत्री विजय शिवतारे कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवड या ठिकाणी महिलांनी निवेदने दिली.लोकमत आपल्या दारी व्यासपीठावरून पाठपुरावामध्यंतरी पुरंदर तालुक्यात ह्यलोकमत आपल्या दारीह्ण कार्यक्रम झाला होता. त्या वेळी सासवडसह ग्रामीण भागातील असंख्य महिलांनी अवैध दारूधंद्याबाबत तक्रारी केल्या होत्या. संबंधित प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या अवैध धंद्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून ह्यलोकमतह्ण याबाबत सतत पाठपुरावा करीत आहे. फोटो ओळी : सुपे खुर्द या ठिकाणी महिलांची विशेष ग्रामसभेला झालेली गर्दी.गावातील सर्व अनधिकृत जे दारूधंदे करीत आहेत त्यांच्यावर त्वरित प्रशासनाने कारवाई करावी. गावातील महिला खूप आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्या भावनांचा विचार प्रशासनाने करावा, अशी प्रशासनाला मागणी केली आहे. - दिलीप चव्हाण, उपसरपंच, सुपे खुर्दआम्ही ज्या गावात अशा प्रकारचे अनधिकृत जे दारूधंदे आहेत त्या ठिकाणी आमची कारवाई चालूच असते, ज्या गावातून माहिती मिळते त्या ठिकाणी आम्ही निश्चित कारवाई करू. ज्यांच्याकडे अधिकृत परवाने आहेत, त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग हे कारवाई करते. सुपे गावातील महिलांना याबाबत आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.- राजेश माळेगावे, सहायक पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस ठाणे.२) सासवड पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यासाठी सुपे खुर्द येथून तीन किलोमीटर चालत आलेल्या महिला.