शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?; 'त्या' गीतावरून विक्रम गोखले संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:15 IST

२०१४ मध्ये देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं या विधानावर विक्रम गोखले ठाम

मुंबई: भारताला १९४७ मध्ये भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, या अभिनेत्री कंगना राणौतच्या विधानांना पाठिंबा दिल्यानं अभिनेते विक्रम गोखलेंवर टीका झाली. त्यानंतर आज गोखलेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं गोखले म्हणाले. मला माझं मत कोणावरही लादायचं नाही. पण माझं मत बदलणार नाही, असं गोखलेंनी सांगितलं.

माझी कंगनाशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत. ती आता सांगत बसत नाही. १८ मे २०१४ रोजीचा गार्डियनचा अंक वाचा. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो. त्यावरून ताबडतोब बोंबाबोंब सुरू झाली, असं विक्रम गोखले म्हणाले.

२०१४ पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आणि ते मी मुळीच बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मी त्या मूळ भाषणात असं म्हणालो की, दे दी हमे आझादी बिना ढाल. म्हणजे विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही? याचा मला राग आला, असं मत गोखलेंनी व्यक्त केलं.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेKangana Ranautकंगना राणौत