शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: वडिलांच्या मंत्रिपदावर शेकताच मुलगा पोलिसांना शरण; विकास गोगावले दीड महिन्यांनंतर 'हजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:48 IST

Vikas Bharat Gogawale Surrender Mahad: महाड नगर पालिका निवडणूक राडा प्रकरणात फरार असलेले विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर. न्यायालयाच्या आदेशानंतर घेतले पाऊल. वाचा सविस्तर.

महाड (रायगड): महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणामुळे चर्चेत असलेले आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण आले आहेत. मागील दीड महिन्यांपासून फरार असलेले विकास गोगावले आज महाड शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

महाड नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन राजकीय गटांत मोठा राडा झाला होता. या हिंसाचार आणि राडा प्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून विकास गोगावले अटकेच्या भीतीने फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी केली होती, मात्र ते सापडले नव्हते.

न्यायालयाचा अल्टिमेटमविकास गोगावले यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, काल (२२ जानेवारी) न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत, तातडीने पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. मुलावर एवढे गंभीर गुन्हे असताना भरत गोगावले मंत्रिपदी कसे, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतर त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. 

राजकीय वातावरण तापलेआमदार भरत गोगावले हे सत्ताधारी पक्षातील वजनदार नेते असल्याने, त्यांच्या मुलाने पोलिसांसमोर केलेले आत्मसमर्पण हा महाडच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. आता पोलीस त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करतील आणि त्यांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister's son, Vikas Gogawale, surrenders to police after court order.

Web Summary : Vikas Gogawale, son of MLA Bharat Gogawale, surrendered to Mahad police after being on the run for a month and a half. He faces serious charges related to violence during municipal elections. The court had ordered his immediate surrender, questioning how Bharat Gogawale could hold a ministerial position given his son's charges.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Policeपोलिस