शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार : विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 12:30 IST

vijay wadettiwar : भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सोलापूर : ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर यावेळी विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. राजकीय शेरेबाजी आणि टोलेबाजीने हा मेळावा चांगलाच गाजला. यावेळी भाजपाचे नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, माकपचे नेते नरसय्या आडम, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ओबीसी मेळाव्याचे राज्य समन्वयक रामराव वडकुते उपस्थित होते. 

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी रस्त्यावर उतरू. तरीही आरक्षण नाही मिळालं तर घोंगडी आणि काठी हातात घेऊ असा इशारा दिला. तसंच ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे. 

याचबरोबर, विजयवडेट्टीवार म्हणाले की, “आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. उलट आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये. आमच्या आरक्षणात प्रस्थापित आले तर इथे कोण टिकणार?”असा सवाल करतानाच “हात जोडून विनंती करतो पण ओबीसींमधून आरक्षण मागू नका”, असं विजय वड्डेटीवार यावेळी म्हणाले.

"हक्क मागणे हा गुन्हा नाही"३१ ऑगस्ट १९५२ रोजी देशाचे भाग्यविधाते पं. जवाहरलाल नेहरूंनी भटक्या विमुक्त जाती-जमातींवरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना तारेच्या कुंपणातून मुक्त केले. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटनेला ७० वर्षे लोटली तरीही भटक्या विमुक्तांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदलला नाही. भटक्या विमुक्त जाती-जमातींसह ओबीसी समाजाने प्रस्थापितांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत. हक्क मागणे हा गुन्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातींना एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केले. परंतु आज काहीजण महाराज ‘आमचे-तुमचे’ अशा भेदभावाची भाषा करतात. या सत्तेला झुकविण्याची ताकद निर्माण करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय आगामी कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, या इशाऱ्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. 

"...तर एक लाख लोक आले असते"आजच्या दिवशीच सोलापूरात भटक्या विमुक्तांना मुक्त करण्याचे काम झाले होते. मात्र समाजाच्या दृष्टीकोणाला आजही आम्ही बदलू शकलो नाही. मान-अपमान सगळं सोडून, पक्षीय बंधनं सोडून चंद्रशेखर बावनकुळे इथे उपस्थित राहिले. कोरोनाचे बंधन नसते, तर एक लाख लोक इथे जमले असते. मंत्री पद काही कायम राहणार नाही. महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची क्षमता या समाजात आहे. माझी इच्छा आहे हा समाज मागणारा नव्हे तर देणारा व्हावा. इंग्रजांची सत्ता गेली तरी आमच्या समाजाला आजही गुलाम असल्यासारखे वाटते. आमच्यातला कोणी चपराशी झाला तरी दोन बायका करतो. अजूनही आम्हाला घर नाही, जातीचे दाखले मिळत नाहीत, असं सांगतानाच 2008 चा जीआर पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवकांना जात कोणती ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNarendra Modiनरेंद्र मोदी