शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 12:45 IST

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठळक मुद्देविधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांची माघारविजय औटी यांचं विधानसभेत अभिनंदन

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सध्या विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपाच्या कोट्यातून हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे. तर, गेल्या चार वर्षांपासून विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त होते. भाजपा-शिवसेना सरकारचा अवघा एक वर्षाचा कार्यकाळ उरला असताना 28 नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबरला सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करायची होती. यात शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

या निवडणुकीत विधानसभेत भाजपा- शिवसेनेचे बहुमत असल्याने शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात होती. मात्र, आज विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली. त्यामुळे विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVijay Autiआ. विजय औटीMaharashtraमहाराष्ट्र