शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 18:36 IST

कोपरगाव मतदारसंघात विखेंचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोपरगाव मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, युतीच्या जागावाटपात सुद्धा हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार कोल्हे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र आता कोपरगाव मतदारसंघात विखेंचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हे यांची डोकेदुखी वाढली आहे.

गोदावरी दुध संघाचे अध्यक्षपद परजणे यांच्याकडे असून ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचा सुद्धा त्यांनी ठरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विखेंना मानणारा वर्ग आणि नातेगोत्यातील लोकं परजणे यांच्या पाठीशी उभा रहू शकतात. त्यातच परजणे यांचा सुद्धा मतदारसंघात चांगली पकड असल्याने, त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय आमदार कोल्हेंची चिंता वाढवणारा आहे.

परजणे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विखे भाजपमध्ये असून त्यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पद सुद्धा आहे. त्यातच जिल्ह्यातील कुणाला उमेदवारी द्यायची ही जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे नेमकी पक्षाकडे कुणाची बाजू मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.