शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये आयारामांमुळे नव्या-जुन्यांचा वाद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:06 IST

एखाद्या पक्षाची सत्ता येणार असल्याचे वातावरण असल्यास अयारामांची तिकडे गर्दी सुरु होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठ्याप्रमाणावर अयारामांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे निष्ठावंत आणि आयाराम अशी दोन गट भाजपमध्ये निर्माण झाले असून, नवीन कार्यकर्त्याना बैलासारखे शिंग मारु नये त्यांना सांभाळून घ्यावे असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना म्हणण्याची वेळ आली. विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर सहजपणे तिची फळे चाखणाऱ्या आयारामांच्या गर्दीत आपला निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याने, निष्ठावंतांच्या वेदना ठसठसू लागल्या असल्याची चर्चा आहे.

एखाद्या पक्षाची सत्ता येणार असल्याचे वातावरण असल्यास अयारामांची तिकडे गर्दी सुरु होते. भाजपमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मेघा भरती सुरु आहे. पक्षात येणाऱ्या नवीन नेत्यांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा घोळका सुद्धा आपल्या साहेबांबरोबर नवा झेंडा हातात घेत असतात. मात्र आता याच आयाराम आणि निष्ठावंत यांच्यात नव्या-जुन्यांचा वाद उफाळून येत असल्याचे दिसत आहे.

नुकतेच पैठण येथील भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. युती बाबतचा निर्णय अजूनही झाला नसताना सुद्धा नव्याने पक्षात आलेले नेते पक्षाकडून आपणच उमेदवार असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण करत असल्याचे सांगत या शिष्टमंडळाने दानवेंसमोर कैफियत मांडली. तसेच मतदारसंघ जर भाजपला सुटला किंवा युती झाली नाही तर जुन्यांपैकी असेल्या इच्छुकाला उमेदवारी देण्याची मागणी सुद्धा यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दानवेंकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणुकीपूर्वी केलेल्या इनकमिंगमुळे भाजपात मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे या मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटते आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तर पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना साभाळून घेण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला होता. मात्र सत्ता नसताना सुद्धा पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंताना डावलून आयाररामांना संधी दिली जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे, हे ही  तितकेच सत्य आहे.