शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Budget Session: शिंदे सरकारला लक्षवेधीही पेलवेना; उत्तराला मंत्रीच गैरहजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:03 IST

मंत्रिमंडळ विस्ताराअभावी सरकारची सभागृहात कसरत; लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केवळ २० कॅबिनेट मंत्र्यांच्या भरवशावर कारभार चालू असल्याने अडचणींचा सामना करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा प्रत्यय मंगळवारी विधानसभेत आला. मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही ते माहिती नाही; पण त्यामुळे राज्याचे नुकसान होत असल्याची टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी  केली, तर मंत्र्यांच्या टंचाईवर दोन्ही सभागृहांतील कामकाजाची विभागणी करण्याचा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्या दोन लक्षवेधी राखून ठेवल्याचे सांगत थेट चौथी लक्षवेधी पुकारली. ही लक्षवेधी सार्वजनिक आरोग्य विभागाची होती. त्यावेळी मंत्री तानाजी सावंत सभागृहात उपस्थित नसल्याने या लक्षवेधीला उत्तर कुणी द्यायचे, असा  पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला.

 अजित पवार यांनी यावेळी सरकारला कामकाज सुरळीत सुरू राहावे म्हणून काही सूचना केल्या. मंत्रिमंडळात २० सदस्य आहेत आणि तेही कॅबिनेट मंत्री आहेत.  कोणत्याही सरकारमध्ये खालच्या सभागृहात कॅबिनेट मंत्री, तर वरच्या सभागृहात राज्यमंत्री उत्तर देतात; पण  या सरकारमध्ये राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे सरकारला वरच्या आणि खालच्या सभागृहातील कामकाज जुळवून घ्यावे लागेल.  आता लक्षवेधी पुकारल्यावर सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. हे टाळण्यासाठी मंत्र्यांच्या कामाचे वाटप करावे लागेल, असे पवार म्हणाले.

‘पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नका’आम्ही सत्ताधारी बाकांवर असताना आता कोणत्या मंत्र्यांचे काम आहे याकडे लक्ष देत होतो. ही जबाबदारी संसदीय कामकाजमंत्र्यांची आहे. त्यामुळे लक्षवेधी पुकारल्यावर मंत्री सभागृहात नाहीत, असा प्रसंग आल्यावर आम्ही उठणार, बोलणार आणि अध्यक्षांच्या लक्षात आणून देणार. त्यामुळे अशी वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी, या असेही अजित पवार यांनी सुनावले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनAjit Pawarअजित पवार