शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 18:05 IST

मुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत.

मुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत. विधान परिषद निवडणुकीत दोन मतं बाद ठरवण्यात आली आहेत. तर विरोधकांची 9 मतं फुटली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता. 

नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक झाली. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली. विधानसभेतील सदस्यांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. त्यानंतर आज युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. कोण आहेत प्रसाद लाड ?छगन भुजबळांचे खंदे समर्थक असणा-या व राष्ट्रवादीची सत्ता जाताच प्रसाद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेले आणि चांगलेच स्थिरावले. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर निवडून आणलं. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील कट्टर समर्थक परिणय फुके यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशीच प्रतिष्ठा पणाला लावली आणि फुके विजयी झाले होते. तथापि फुकेंची गणना मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांपेक्षा मित्रांमध्ये होते. प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह यांना विधान परिषदेवर पाठविताना मुंबई महापालिकेचे राजकारण डोळ्यांसमोर होते. मात्र, आज लाड यांना मिळालेली उमेदवारी ही मुख्यमंत्री समर्थकांना भविष्यात मिळणार असलेल्या संधीची सुरुवात मानली जात आहे.

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा