शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Vidhan Parishad Election: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:06 IST

सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे खोत माघार घेणार अशी चर्चा झाली.

मुंबई - राज्यसभेच्या निकालात भारतीय जनता पार्टीने ३ जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली. अपक्ष आणि छोट्या मित्रपक्षांची मते फुटल्याने भाजपाला यश मिळेल. मात्र राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे ५ तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत. 

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय हालचाली वाढल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, महाविकास आघाडीकडे मते जास्त आहेत. भारतीय जनता पार्टीकडे ४ निवडून येतील एवढी मते आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे. तर काँग्रेसनं त्यांचा उमेदवार मागे घ्यावा मग बिनविरोध निवडणुकीबाबत विचार केला जाईल असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले होतं. 

त्याचवेळी सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे खोत माघार घेणार अशी चर्चा झाली. परंतु माध्यमांशी बोलताना खोत म्हणाले होते की, भाजपाने ६ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आजही आम्ही ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक होणार आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी विधान परिषदेच्या निवडणुकीत उफाळून येईल. मोठ्या संख्येने भाजपाकडे मते वळाल्याची दिसतील असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे ज्यांनी त्यांना घोडे म्हणलं त्यांना घोडा लागेल. मला अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही. काँग्रेसनं जागा मागे घ्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं सांगितले. मात्र अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येत्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुका होणार त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSadabhau Khotसदाभाउ खोत BJPभाजपा