शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पदवीधर, शिक्षक मतदारसंघावर ठाकरे गटाचा कब्जा, निरंजन डावखरे यांची हॅटट्रिककडे वाटचाल  

By कमलाकर कांबळे | Updated: July 1, 2024 19:25 IST

Vidhan Parishad Election Result: विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकस आघाडीतील ठाकरे गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.  प

-कमलाकर कांबळे नवी मुंबई - विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकस आघाडीतील ठाकरे गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.  पदवीधर मतदारसंघातून उध्दवसेनेचे अनिल परब यांनी २६ हजार २० मतांनी विजयी झाले आहेत. तर शिक्षक मतदारसंघातून उध्दवसेनेचे ज.मो. अभ्यंकर यांनीही निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचाही विजय निश्चीत मानला जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादीत करून  विजयाची हॅटट्रीक साधतील, असे त्यांनी घेतलेल्या मतांच्या आघाडीवरून स्पष्ट झाले आहे. 

निरंजन डावखरे यांना मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांतच तब्बल ३५ हजार मते पडली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे रमेश कीर यांना केवळ ७ हजार मते मिळाली होती. मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या संपल्या असून डावखरे हे मतांची मोठी आघाडी घेवून विजयी झाले आहेत. मात्र सांयकाळी ७ वाजेपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती.

मुंबई शिक्षक मतदारसंघात पंचरंगी लढत झाली. या मतदारसंघात उध्दवसेनेचे अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदेसेना पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते. यात उध्दवसनेचे अभ्यंकर आघाडीवर आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीतील उध्दवसेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. परब यांनी चार पैकी पहिल्या दोन फेरीतच विजयासाठी जाहिर केलेला मतांचा कोटा गाठला. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे निरंजन डावखरे यांनी विजयाची लय कायम ठेवत सलग तिसऱ्यांदा विजयाच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Anil Parabअनिल परबNiranjan Davkhareनिरंजन डावखरे