शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिका-यास मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:53 IST

गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांना संशयित

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांना संशयित वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर (रा. मूळ गाव आजरा, सध्या ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकारी) हे मारहाण करीत असल्याचा व्हीडीओ मंगळवारी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली.या प्रकरणी ३१ जानेवारी २०१७ रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात कुरुंदकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना तपासादरम्यान बिद्रे यांच्या लॅपटॉपमध्ये प्रत्येकी अर्ध्या तासाच्या सहा क्लिप्स, ३९ आॅडिओ व साडेचार हजार व्हॉट्सअ‍ॅप छायाचित्रे मिळाली आहेत. त्यातील दीड हजार छायाचित्रे या प्रकरणाच्या तपासावर प्रकाशझोत टाकणारी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.अश्विनी गोरे बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार १४ जुलै २०१६ रोजी पोलिसांत दिली;आता पंधरा दिवसांत या प्रकरणाचा छडा न लागल्यास आम्ही कुटुंबासह नागपूरला हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या दारात जाऊन आमरण उपोषणास बसणार आहोत.- आनंद बिद्रे, अश्विनी बिद्रे यांचा भाऊ

टॅग्स :Policeपोलिस