शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोळसा खाणीकडे जाणारा ट्रक अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:39 IST

रेल्वे सायडिंगवर कोळसा खाली करून मुंगोली खाणीत जात असलेल्या ट्रकला पाच ते सहा अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले.

ठळक मुद्देरेल्वे सायडिंगवर कोळसा खाली करून मुंगोली खाणीत जात असलेल्या ट्रकला पाच ते सहा अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून पेटवून दिला

वणी ( जि. यवतमाळ) : वणीच्या रेल्वे सायडिंगवर कोळसा खाली करून मुंगोली खाणीत जात असलेल्या ट्रकला पाच ते सहा अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पेटवून देण्यात आलेला ट्रक हा चंद्रपूर येथील पीएमपील ट्रान्सपोर्ट कंपनीचा आहे. ट्रकचालक चरणदास गोच्चूम शन्नूरवार (रा.घुग्गूस) हा रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ट्रकमधील कोळसा रेल्वेसायडिंगवर खाली करून  मुंगोली कोळसा खाणीकडे निघाला होता. मुंगोली कोळसा खाणीच्या चेकपोस्ट क्रमांक १ वर अचानक पाच ते सहा इसमांनी ट्रक अडविला. या अज्ञातांनी धमकी देऊन ट्रकचालक चरणदासला ट्रकच्या खाली उतरविले. त्यानंतर ट्रकच्या केबीनवर पेट्रोल शिंपडून ट्रक पेटवून दिला. 

त्यामुळे ट्रकचा क्षणात भडका उडाला. धावाधाव आरडाओरड सुरू झाली. लगेच खाणीतील अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोवर ट्रकची केबीन जळून खाक झाली होती. अज्ञात इसमांनी केलेल्या कृत्यात ट्रकचे १२ लाख रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. व्यावसायिक वादातून ही घटना घडली असावी, अशी पोलिसांना शंका आहे. त्या दिशेने तपास केला जात आहे. जाळपोळ करणारे आरोपी पोलिसांच्या टप्प्यात असून लवकरच ते हाती लागतील, असा विश्वास या प्रकरणातील तपास अधिकारी पीएसआय कांडुरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Petrolपेट्रोलPoliceपोलिस