शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

VIDEO: मृत्यूच्या दाढेतून नशिबानेच वाचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 18:48 IST

ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 18 : काळ आला होता,पण वेळ नाही,दैव बलवत्तर म्हणून वाचलो, मृत्यूच्या दाढेतून सखुरूप परतलो, अशा ...

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 18 : काळ आला होता,पण वेळ नाही,दैव बलवत्तर म्हणून वाचलो, मृत्यूच्या दाढेतून सखुरूप परतलो, अशा भावना वेल्ह्यातील मढीघाट येथील धबधबा दुर्घटनेतून बाचावलेल्या रमेश माने यांनी व्यक्त केल्या.

चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, उजवा हात आणि उजवा पाय फ्राक्चर असल्याने कालच शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर जे संकट आले,तसे कोणावरही ओढवू नये , मला संकटकाळी थरमॅक्स कंपानीतील सहकारी मित्रांनी,संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी जे सहकाट्या केले ते मी कधीही ऊसारणार नाही, दैवी कृपा आणि मित्राचे सहकार्य यामुळेच मी सुखरूप आलो आहे, मी सर्वांचे धान्यवाद मानतो,पर्यटनाला जाताना त्या स्थळाची,परिसराची माहिती घ्या, सुरक्षिततेची योग्य खबरदारी घ्या, असे मी यानिमित्ताने सांगेन. 

अतिदुर्गम कोकणकड्यानजीक असलेल्या मढेघाट धबधब्याच्या कड्यावरुन दाट धुक्यात एक पर्यटक पाय घसरुन दरीत कोसळल्याची घटना रविवार (दि. १५) रोजी घडली. सुदैव म्हणून दरीत कोसळून तो झाडाच्या फांदीला अडकून बसला आणि यामुळे त्याचे प्राण वाचले. १६ तास तो तेथेच अडकून बसला होता.  https://www.dailymotion.com/video/x8458h0

 

 

अधिक माहिती आशी की,  रविवारी पुण्यातील  थरमॅक्स कंपनी मधील १५ जणांचा ग्रुप वेल्ह्यात पावसाळी सहलीसाठी आला होता.  सायंकाळी ५.०० चे सुमारास मढेघाट येथून  सर्वजण परतीला निघत  होते. यावेळी जोरदार पाऊस होता. मात्र दाट धुक्यात अचानक रमेश माने हे गायब झाल्याचे सर्वांना लक्षात आले. सर्व मित्रांनी आरडाओरड करत माने यांचा शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र घनदाट जंगल,  मुसळधार पाऊस, धोकादायक कडा आणि खोल दर्या यामुळे शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या. केळदचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना घेऊन रात्री १० वाजेपर्यंत शोधाशोध केली पण सदर व्यक्ती कुठेच सापडली नाही. शेवटी मध्यरात्री वेल्हे पोलीस ठाण्यात माने यांचे मित्र प्रविण सदामत यांनी मिसींग तक्रार दाखल केली.

 

दरीमधील १६ तासांचा थरार

दाट धुक्यात न दिसल्याने माने उंच कड्यावरुन खाली कोसळून दरीतील झाडाला लटकले. सायंकाळी ५ ते दुसर्या दिवशी स. ९ वाजेपर्यंतचा १६ तासांचा अंधार्या खोल दरीमधे झाडाला लटकण्याचा थरार त्यांनी आनुभवला. हिंस्र श्वापदे, किर्र अंधार, मुसळधार पाऊस यांचा सामना करत त्यांनी रात्र काढली. जबर मार लागल्याने काही तास बेशुद्ध झाल्याने त्यांना आपण कुठे आहोत हे समजात नव्हते. मध्यरात्री पुण्यातील एका ट्रेकर्स ग्रुपला पाचारण करण्यात आले. धाडसी ट्रेकर्सनी रोपच्या मदतीने दरीत उतरुन तब्बल ६ तास शोधमोहीम राबऊन झाडावर लटकलेल्या व्यक्तीला बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. खोल दरीत कोसळूनही दैव बलवत्तर म्हणूनच रमेश माने यांचा जीव वाचला आशी सर्वत्र चर्चा आहे.

 

पहाटेपासून ट्रेकर्सची थरारक शोधमोहीम- 

मध्यरात्री पुण्यातील दादोजी कोंडदेव ट्रेकर्स व जीमच्या साहसी चार ट्रेकर्सना मढेघाट येथे पाचारण केले. पहाटे ५.०० पासून पडत्या पावसात धोका पत्करुन ट्रेकर्सनी दरीमधे उतरुन शोधमोहीम चालू केली. त्यांना या ग्रुपमधील सदस्यांनीही मदत केली. दाट जंगल आणि घसरडा तीव्र उतार यामधे घुसत माने यांचा शोध चालू झाला. झाडे झुडपे, कपारी, घळी यांमधे शोध घेताना सकाळी ९ च्या दरम्यान खालच्या शेवटच्या बेस पॉईंटवर एका झाडाला लटकलेले अवस्थेतील रमेश माने दिसले आणि सर्वाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना उचलून कड्यावर आणले व गाडीत घालून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

 

दुर्घटनाग्रस्त माने हे दरीत कोसळून १२ तास होऊन सापडत नसल्याने ते जिवंत असल्याची शक्यता कमीच वाटत होती. मात्र मला सदर व्यक्ती झाडावर दिसला व त्यांनी मला हात केला तेव्हा ते जिवंत आहेत हे कळल्याने मला एकदम स्फूर्ती निर्माण झाली व धोका पत्करुन ग्रुपमधील ट्रेकर्सच्या मदतीने  त्यांना तातडीने बाहेर काढले. कारण त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती. यासाठी केळद (ता.वेल्हे) ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.

 

   - सचिन गायकवाड, अध्यक्ष- दादोजी कोंडदेव जीम व ट्रेकर्स,पूणे.

 

पर्यटकांनी वेल्ह्यातील निसर्गाचा आनंद लुटताना स्वत:च्या जिवाचाही विचार करावा. वेल्हे परिसरातील अनेक पर्यटनस्थळे दुर्गम व धोकादायक असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी. अतिउत्साही होऊन धांगडधिंगा करु नये.  मद्यपान करुन गोंधळ घातल्यास व बेशिस्तपणे वागल्यास अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

 

     - श्री. बडवे, सहा. पोलीस उपनिरिक्षक. वेल्हे.पो.स्टे.