शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

VIDEO- जिजाऊंच्या भूमीत उसळला जनसागर

By admin | Updated: September 26, 2016 18:01 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन सोमवारी या ठिकाणी पाहायला मिळाले.

ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 26 - कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन सोमवारी या ठिकाणी पाहायला मिळाले. या मोर्चामध्ये काटेकोर नियोजन व शिस्तबद्धता वाखाणण्याजोगी होती. बुलडाणा शहरात अत्र, तत्र, सर्वत्र केवळ माणसच माणसं दिसत होती. या मोर्चात तरुणी व    महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. या मोर्चात तब्बल १५ लाख मोर्चेकरी सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.गत पंधरा दिवसांपासून मोर्चाची गावोगावी तयारी सुरू होती. नियोजनानुसार सोमवारी सकाळपासूनच गावातून जथ्थेच्या जथ्थे बुलडाण्यात दाखल होत होते. कोणत्याही पक्ष किंवा संघटनेच्या हाती सूत्रे नाहीत, अग्रभागी कुणी राजकीय पुढारी-नेता नाही, तरीही लाखोंच्या संख्येने एकत्र आलेल्या मराठा समाजाची शिस्त व शांतता या ठिकाणी बुलडाणेकरांना 'याचि देही याचि डोळा'अनुभवता आली.अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि स्वामीनाथन आयोग लागू करणे या मागण्यांसोबतच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शहीद म्हणून घोषित करा, ६०वर्षांवरील शेतकऱ्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगण्याकरिता ५ हजार रूपये सन्मान वेतन देण्यात यावे, मातृतीर्थ सिंदेखड राजा येथे महिला ग्रामीण विद्यापीठाची स्थापणा करावी या नवीन मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या स्टेजसमोर तसेच आजूबाजूला सर्व मराठा बांधव जमले होते. सकाळी ७ वाजतापासूनच जिल्हाभरातील नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्धपणे सुरूवातीला युवती, महिला व त्यानंतर पुरूषांचा मोर्चामध्ये समावेश होता. सकाळी ११.३० वाजतापासून मागण्यांच्या वाचनाला सुरूवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. तर १२.३० वाजता राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मंचावरील ११ मुलींनी २२ मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात लाखों समाजबांधव सहभागी झाले होते.  मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध घोषणांचे फलक लक्ष्यवेधी होते.  अनेकांनी काळे टी शर्ट परिधान करत तसेच महिलांनी काळ्या साड्या परिधान करत निषेध नोंदविला. डोक्यावर असलेल्या काळ्या व भगव्या  टोप्याही लक्ष वेधून घेत होत्या. बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोचार्साठी विक्रमी गर्दी पहायला मिळाली. पहाटे ५ वाजेपासूनच मराठा समाजाचे गावा गावातील जत्थेच्या जत्थे बुलडाण्याकडे रवाना होत होते. शहराच्या चोहोबाजूंनी व्यवस्था करण्यात आलेल्या वाहनतळांवरही वाहने खच्चून भरली होती.लाखो महिलांचा सहभागलाखोंची गर्दी, कुठेही आवाज नाही, काळजाला हात घालणारी नि:शब्द शांतता असे वातावरण मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्वांनी सोमवारी बुलडाण्यात अनुभवले.मोर्चात तब्बल तीन लाखांवर महिला सहभागी होत्या. रस्त्यांवर लाखोंची गर्दी, महिलांचा लक्षणीय सहभाग, कोपर्डी येथील घटनेचा राग, मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्याचा पक्का निर्धार करून एकत्रजमलेल्या  मराठा समाजाच्या जनसागराची लाट उसळली.जिजाऊंच्या प्रतिमेसह जिजाऊंच्या लेकी मोर्चातबुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ही जिजाऊंची जन्मभूमी आहे. त्यामुळे सकल मराठा मोर्चात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि झेंड्यांसोबतच जिजामातेचे छायाचित्र असलेले झेंडे आणि प्रतिमा मोठ्या प्रमाणात दिसून आले. जिजाऊंच्या लाखो लेकींनी जिजाउंची प्रतिमा उंचावून धरली होती. त्यामुळे मोर्चात सर्वत्र शिवछत्रपती आणि जिजाऊंची छायाचित्रे झळकत होती.रस्त्यावर चौफेर रांगामराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलेल्या जयस्तंभ चौकाला जिल्ह्यातील मुख्य रस्ते जोडले आहेत. त्यामुळे चौकाच्या चारही बाजुंनी असणाऱ्या मुख्य रस्त्यांवर सकल मराठा समाजाच्या रांगाच्या रांगा दिसून येत होत्या. विशेष म्हणजे जयस्तंभ चौक परिसरात असलेल्या सर्व इमारतींवर सुद्धा मराठ्यांची एकच गर्दी होती.श्रद्धांजली आणि राष्ट्रगीतासाठी लक्षावधी लोक स्तब्धया मोर्चात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी आणि उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यावेळी लाखो लोक स्तब्ध झाले होते.