शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

VIDEO: नायलॉन मांजाने केला गरुडाचा घात!

By admin | Published: January 16, 2017 7:37 PM

राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत  अकोला, दि. 16 - जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे मांजामुळे जखमी अवस्थेत आढळलेल्या गरुड पक्ष्यावर ...

राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 16 - जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे मांजामुळे जखमी अवस्थेत आढळलेल्या गरुड पक्ष्यावर सोमवारी दुपारी कृषी विद्यापीठ परिसरातील स्नातकोत्तर पशुविज्ञान व पशुवैद्यकीय संस्थेत उपचार करण्यात आले; मात्र खोल जखम आणि अधिक रक्तस्राव झालेला असल्यामुळे उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले.

आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मानवाला सदोदित प्रेरित करणारा पक्षी म्हणजे गरुड. पक्ष्यांचा राजा समजला जाणारा हा पक्षी अत्यंत कठीण परिस्थितीसुद्धा जीवन जगण्याची क्षमता बाळगतो; मात्र दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होण्यास केवळ आणि केवळ मानवच कारणीभूत ठरत आहे. याचा प्रत्यय सोमवारी अकोलेकरांना आला. जिल्ह्यातील निंबी मालोकार या गावात नॉयलॉनच्या मांजामुळे जखमी झालेला चार फूट आकाराचा गरुड पक्षी, याच गावातील रहिवासी पर्यावरण मित्र प्रकाश राऊत यांना आढळून आला.

विद्युत खांबावरील तारेमध्ये गुतंलेल्या नॉयलॉनच्या मांजात तो लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. महत्प्रयासाने त्याची मुक्तता करून त्यांनी जखमी गरुडास येथील उप वनक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणले. त्यानंतर त्यास कृषी विद्यापीठ परिसरातील स्नातकोत्तर पशुविज्ञान व पशुवैद्यकीय संस्थेत उपचारार्थ हलविण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर डॉ. एस. पी. वाघमारे, डॉ. एम. जी. थोरात, परिविक्षाधीन विद्यार्थी डॉ. सचिन कोकोडे, डॉ. वैजनाथ काळे व विष्णू दळवी यांनी उपचार केले; मात्र खोल जखम आणि अधिक रक्तस्राव झालेला असल्यामुळे उपचारादरम्यान तो गतप्राण झाला. यानंतर सर्पमित्र मुन्ना खान यांच्या सहकार्याने त्याचा अंत्यविधी करण्यात आला.

https://www.dailymotion.com/video/x844ohx