शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

VIDEO : लोकमत शॉपिंग उत्सवाचे शानदार उदघाटन

By admin | Updated: January 6, 2017 21:11 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 6 - हौशी कोल्हापुरकरांना केसांमधल्या पिनांपासून ते पायातल्या चपलांपर्यंत, फॅशनच्या कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, प्युरीफा़यरसारख्या होमअप्लायन्सेसपासून मोबाईल ...

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 6 - हौशी कोल्हापुरकरांना केसांमधल्या पिनांपासून ते पायातल्या चपलांपर्यंत, फॅशनच्या कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, प्युरीफा़यरसारख्या होमअप्लायन्सेसपासून मोबाईल अ‍ॅक्सेसरीजपर्यंत चटपटीत खाद्यपदार्थांपासून खेळण्यांपर्यंत अशा वैविध्यपूर्ण वस्तूंच्या मनसोक्त खरेदीचा आनंद देणाऱ्या लोकमत शॉपिंग उत्सव २०१७ चे शानदार उदघाटन आज झाले. पहिल्याच दिवशी झालेल्या ग्राहकांच्या गर्दीने उत्सवाच्या यशस्वीतेची मोहर उटवली. 
डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवनमध्ये तब्बल चार दिवस रंगणाऱ्या या उत्सवाचे उदघाटन प्रतिमा पाटील, ज्योती पाटील, सोनाली चिपडे, वर्षा पोवार व वसुंधरा शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी वरीष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते. नव़्या वर्षाचे स्वागत खरेदीउत्सवाने करतानाच खवय्यांना चटपटीत पदार्थांचा आस्वाद आणि हजारोंची बक्षिसे जिंकून देणाºया लोकमत शॉपिंग उत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉल्सवर गर्दी केली. या उत्सवाच्या निमित्ताने चार दिवस ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण खरेदीचे नवे दालन उपलब्ध झाले. या उत्सवाला काविरा नॅचरल्स याचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. ‘परफेक्ट किचन ट्रॉली अ‍ॅन्ड फर्निचर’ यांचे संयुक्त सहप्रायोजकत्व तर चॅनेल पार्टनर म्हणून ‘एसपीएन डिजिटल’ यांचे सहकार्य लाभले आहे. 
उत्सवाच्या निमित्ताने हॉलसह बाह्य परिसरातही स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरच करण्यात आलेल्या सुरेख सजावटीने मन प्रसन्न होते. हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच खरेदीचा सुरु होणारा हा प्रवास किमान तासभर तरी ग्राहकांना वैविध्यपूर्ण वस्तू पाहिल्याचा, खरेदी केल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद देतो. ताणतणावाच्या जीवनशैलीत डायटफूड, सेंद्रीय धान्य, स्वच्छ पाणी, आयुर्वेदीक औषधी, नैसर्गिक उत्पादने यांना प्राधान्य देणाºया चोखंदळ ग्राहकांची आवड निवड आणि त्यांच्या बजेटचा विचार करुन मांडण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलवर एखादी तरी वस्तू खरेदी केल्याशिवाय पाय पुढे सरकत नाही.  
 कोल्हापुरातील लघुद्योजकांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंतच्या विविध ब्रँडच्या आकर्षक वस्तू या खरेदी उत्सवात पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. ‘एकाच छताखाली अख्ख्या कुटुंबाच्या खरेदी’चा आनंद देणारा हा उत्सव कोल्हापूरकरांमधील खवय्येगिरीलाही तृप्त करणारा आहे.    
उत्सवात लहान मुलांच्या खेळण्यांपासून, तरुणाईसाठी दुचाकी, चारचाकी गाड्या, नव-नव्या अ‍ॅक्सेसरिज, संगणक खरेदी-विक्री, संगणक अ‍ॅक्सेसरीज, तरुणींसाठी नव्या ट्रेंडचे कपडे, इमिटेशन ज्वेलरी, पेपर ज्वेलरी, बांगड्या, मोत्याचे दागिने, आयुर्वेद, पंचकर्म, बिस्कीटे, फॅशनचे चप्पल, शूज,  थ्रेडींग ज्वेलरी,  गृहिणींच्या आवडत्या डिझायनर साड्या, गृहसजावटीच्या वस्तू, फर्निचर, पडदे, कव्हर, महिलांचे काम हलके करणाºया इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्याधुनिक गॅझेट्स, फायनान्स, सौंदर्य, विवाहविषयक वस्तू, शेंगदाणा, घरी बनवलेले चॉकलेट, तीळाचे लाडू, विविध प्रकारची पीठं, लोणची, चटण्या,  फॅशन आणि लाईफ स्टाईल अशा सर्वप्रकारच्या सेवा व वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.  यासह लग्नसोहळ्या सारख्या खास समारंभासाठी आकर्षक कपडे, साठी लागणारे ड्रेस, हनिमून पॅकेजिस, केश स्टायलिस्ट, मेकअप, टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्ससंबंधीचे स्टॉल्सही येथे आहेत. तब्बल चार दिवस रंगणाºया ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ला मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदीसोबतच लुटा बक्षिसांचा आनंद.

https://www.dailymotion.com/video/x844nhp